22.9 C
Latur
Wednesday, July 28, 2021
Homeराष्ट्रीयचितेवरील प्रेत उठून बसले, ओम ओम बोलू लागल

चितेवरील प्रेत उठून बसले, ओम ओम बोलू लागल

एकमत ऑनलाईन

भोपाळ : मध्य प्रदेशमधील अशोक नगर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली. येथील स्मशानभूमीतील चितेवर ठेवलेले प्रेत उठून बसले. त्याच्या तोंडून मोठ्याने ‘ओम ओम’ असा आवाज येऊ लागला. त्याचा श्वासोच्छ्वास सुरू झाला़ त्यामुळे मृत व्यक्तिच्या नातेवाईकांचा गोंधळ उडाला. मध्य प्रदेशमधील अशोक नगर जिल्ह्यात राहणारा अनिल जैन हा तरुण आजारी पडला. त्यामुळे त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उपचारादरम्यान त्याला कोरोना झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले, मात्र गुरुवारी सकाळी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आणि त्याचे प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले. अंत्यसंस्काराकरिता त्याला स्मशानात नेले, तेव्हा त्याच्या शरीराची हालचाल जाणवली. त्याच्या तोंडून ओम ओम असा आवाजही ऐकू आला आणि तो चितेवरच उठून बसला. त्यामुळे गावात खळबळ उडाली.

मृत तरुण अनिल जैन चितेवर उठून बसल्यामुळे तातडीने डॉक्टरांना बोलवण्यात. रुग्णवाहिकेसह डॉक्टरांचे पथक स्मशानभूमीत हजर झाले. त्यांनी जैन यांना तपासून मृत घोषित केले, पण या डॉक्टरांचे म्हणणे नातेवाईकांना पटले नाही म्हणून त्यांनी अनिल जैन यांना पुन्हा जिल्हा रुग्णालयात तपासण्याकरिता नेले, अशी माहिती मृत अनिल जैन यांच्या भावाने दिली. या घटनेमुळे नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना दोषी ठरवले आहे. तसेच जिल्हा रुग्णालयात अनिल जैन जिवंत होते़ त्यामुळे रुग्णालय व्यवस्थापनावर बेजबाबदारपणाचा आरोप मृत व्यक्तिच्या नातेवाईकांनी केला आहे.

गोव्यात चार दिवसांत ७४ रुग्णांचा मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या