22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeराष्ट्रीयआगामी काही महिन्यांत मोबाईलचा खर्च वाढणार

आगामी काही महिन्यांत मोबाईलचा खर्च वाढणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आगामी काही महिन्यांमध्ये आपल्या मोबाईल फोनचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. टेलिकॉम कंपन्या पुढील एक किंवा दोन तिमाहीत आपल्या टॅरिफमध्ये वाढ करण्याच्या तयारी आहेत. आगामी १ एप्रिलपासून सुरू होणारे आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये आपला महसूल वाढवण्यासाठी टेलिकॉम कंपन्या पुन्हा एकदा दरवाढीचे पाऊल उचलण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीसंबंधी माहिती देणारी कंपनी आयसीआरएच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. यापूर्वी गेल्या वर्षीही काही कंपन्यांनी आपले टॅरिफ वाढवले होते. कोरोना महासाथीच्या काळात अनेक क्षेत्रांना मोठा फटका बसला होता. परंतु टेलिकॉम क्षेत्रात याचा परिणाम तुलनेने कमी दिसून आला.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांचे २जी मधून ४ जीमध्ये अपग्रेडेशन होत असल्या कारणाने दरवाढीमधून एवरेज रेवेन्यू पर युझरमध्ये सुधारणा होऊ शकते, असे आयसीआरएने म्हटले आहे. मीडियम टर्ममध्ये हे जवळपास २२० रूपये होऊ शकते. ज्यामुळे पुढील दोन वर्षांमध्ये या क्षेत्राचा महसूल ११ ते १३ टक्के आणि आर्थिक वर्ष २०२२ मध्ये आॅपरेटिंग मार्जिन जवळपास ३८ टक्के वाढेल, असेही सांगण्यात आले आहे.

‘कॅश फ्लो’मध्येही सुधारणा होणार
आयसीआरएच्या म्हणण्यानुसार कॅश फ्लो जनरेशनमध्येही सुधारणा होणार असून भांडवली खर्चांमध्येही घट झाल्यामुळे बाहेरून कर्ज घेण्याची आवश्यकता कमी भासेल. परंतु एजीआरची रक्कम देण्याव्यतिरिक्त कर्ज आणि पुढील स्पेक्ट्रमच्या लिलावाकडे पाहता टेलिकॉम कंपन्यांवर दबाव कायम राहणार असल्याचे म्हटले जात आहे.

लॉकडाऊनचा परिणाम नाही
कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर बहुतांश क्षेत्रांवर मोठा परिणाम झाला होता. परंतु टेलिकॉम क्षेत्रावर याचा अधिक परिणाम झाला नाही. लॉकडाऊनच्या सुरूवातीच्या काळात फिजिकल रिचार्ज उपलब्ध नसल्याने आणि इनकमिंगची सुविधा वाढवण्यात आल्याने टेलिकॉम कंपन्यांच्या एवरेज रेव्हेन्यू पर युझरमध्ये घट झाली होती.

डेटा वापरात वाढ
लॉकडाऊनदरम्यान टेलिकॉम कंपन्यांनी वैधता संपल्यानंतरही रिचार्ज न केल्यास इनकमिंग कॉलची सुविधा बंद केली नव्हती. परंतु काही वेळानंतर वापर आणि टॅरिफमध्ये झालेल्या वाढीमुळे परिस्थितीत सुधारणा झाली. वर्क फ्रॉम होम, आॅनलाईन स्कूल, आॅनलाईन कंटेन्ट पाहण्यामुळे डेटाचा वापरही वाढला आहे.

केंद्राच्या सर्व कर्मचा-यांना कार्यालयात जाणे आवश्यक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या