27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeराष्ट्रीयदेश पुन्हा गुलामगिरीच्या युगात

देश पुन्हा गुलामगिरीच्या युगात

एकमत ऑनलाईन

कन्याकुमारी : काँग्रेसने बुधवारी कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रेला सुरुवात केली. यावेळी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल करीत लोकांना यात्रेची माहिती दिली. देश पुन्हा एकदा गुलामगिरीत लोटला जात असून, आता ३-४ कंपन्या देशावर राज्य करीत आहेत. पंतप्रधान मोदींमुळेच ही नौबत आल्याचे टीकास्त्रही त्यांनी सोडले. तसेच पंतप्रधान मोदी दिवसभर वृत्तवाहिन्यांवर दाखवले जातात. आम्हाला कोणीही दाखवत नाही, म्हणून आम्ही यात्रा काढत आहोत, असे ते म्हणाले.

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेचा शुभारंभ बुधवारी सायंकाळी कन्याकुमारी येथून झाला, त्यावेळी राहुल गांधी बोलत होते. यावेळी कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, के.सी. वेणुगोपाल, दिग्विजय सिंह, अशोक गेहलोत, भूपेश बघेल, योगेंद्र यादव यांनीही संबोधित केले. करोडो लोकांचे भविष्य एका व्यक्तीच्या हातात आहे आणि ते तयार करण्याऐवजी हे विरोधकांना ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवतात. दुसरी गोष्ट म्हणजे आपण पुन्हा गुलामगिरीच्या युगात जात आहोत. कारण पूर्वी एक ईस्ट इंडिया कंपनी देशावर राज्य करत होती. आता ३-४ कंपन्या हे काम करत आहेत, असा घणाघातही राहुल गांधी यांनी केला.

तत्पूर्वी, सकाळी राहुल गांधी यांनी श्रीपेरंबुदूरला भेट देऊन वडील राजीव गांधी यांच्या स्मृतिस्थळावर कॉंग्रेस नेत्यांसह श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी द्वेषामुळे मी माझे वडील गमावले. पण आता मी देश गमावू शकत नाही, असे म्हटले. राहुल सुमारे दीड तास श्रीपेरंबुदूरमध्ये थांबले. याच ठिकाणी १९९१ मध्ये राजीव गांधी यांची हत्या झाली होती.

भारत जोडो यात्रा तामिळनाडूमधील कन्याकुमारीपासून केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा आणि पंजाबमार्गे काश्मीर केंद्रशासित प्रदेशात जाईल. राहुल गांधी यांचा हा प्रवास सुमारे ३५७० किमीचा आहे. या यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस लोकसभेच्या ३७२ जागांवर लक्ष केंद्रित करत आहे.

विरोधक भाजपला घाबरणार नाहीत
भाजपावर निशाणा साधत राहुल गांधी म्हणाले की, त्यांना (भाजपा) वाटते की ते सीबीआय, ईडी आणि आयटीचा वापर करून विरोधकांना घाबरवू शकतात. मात्र ते भारतीय नागरिकांना ओळखत नाहीत. भारतीय घाबरत नाहीत. एकही विरोधी पक्षाचा नेता भाजपाला घाबरणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

तीन प्रकारचे यात्री

-भारत यात्री : पदयात्रेत राहुल गांधींसोबत १०० प्रवासी असतील, जे त्यांच्यासोबत सुरुवातीपासून शेवटपर्यंत चालतील. त्यांना भारत यात्री म्हटले जाईल.

-प्रदेश यात्री : ज्या राज्यांमधून ही यात्रा जाईल, त्या राज्यांमधील १००-१०० लोकांचा सहभाग असेल. ज्यांना प्रदेश यात्री म्हटले जाईल.
-अतिथी यात्री : ज्या राज्यांतून हा प्रवास होणार नाही, तिथून १००-१०० लोक सामील होऊ शकतात. या लोकांना अतिथी यात्री म्हटले जाईल.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या