24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयदेश अद्यापही वीज संकटाच्या उंबरठ्यावरच

देश अद्यापही वीज संकटाच्या उंबरठ्यावरच

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जगातील सर्वांत मोठी कोळसा कंपनी आणि केंद्र सरकारच्या मालकीची कोल इंडिया लिमिटेड ही २०१५ नंतर (मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर) पहिल्यांदाच कोळसा आयात करण्याच्या तयारीत आहे.
देशातील कोळसा संकटाचा सामना करण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. आयात करण्यात आलेला कोळसा कंपनी देशभरातील वीज उत्पादन केंद्रांना देणार आहे.

शनिवारी यासंदर्भातील एक पत्रही समोर आल्याची माहिती वृत्तसंस्था ‘रॉयटर्स’ने दिली आहे. कोळशाच्या संकटामुळे पुन्हा भारनियमन होण्याची भीती अधिक गडद झाली आहे. या समस्यांना तोंड देण्यासाठी ऊर्जा मंत्रालयाने अनेक पावले उचलली आहेत. असे झाल्यास कोल इंडियाने कोळसा आयात करण्याची २०१५ नंतरची ही पहिलीच वेळ असेल.

एप्रिलच्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्य आणि केंद्राच्या अधिका-यांनी कोळशाचा साठा सुनिश्चित करण्यास सांगितले आहे. एप्रिलमध्ये, देशभरातील थर्मल पॉवर प्लांट्सना सहा वर्षांत प्रथमच कोळशाच्या सर्वांत वाईट संकटाचा सामना करावा लागला. याचाच परिणाम अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्याचे प्रकार घडले होते.

दरम्यान, कोळसा आयात करण्याशी निगडीत निरनिराळ्या निविदांमुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल. यामुळे कोल इंडियाच्या माध्यमातूनच कोळशाची खरेदी केली जावी, अशी मागणी जवळपास सर्वच राज्यांकडून करण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. याच मागणीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या