23.2 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeराष्ट्रीयनेहरुंच्या धोरणामुळेच देशाचे नुकसान

नेहरुंच्या धोरणामुळेच देशाचे नुकसान

एकमत ऑनलाईन

मुंबई : पंडित जवाहरलाल नेहरुंना शांतीदूत बनावे असे वाटत असल्याने देश कमकुवत झाला आहे आणि खूप वेळापर्यंत हे सुरुच होते, असे विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित अशक्य ते शक्य या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या पत्नी आणि इतर जण उपस्थित होते.

अटलबिहारी यांचा कार्यकाळ सोडून दिला़ तर त्याआधी वाटले की देशाच्या सुरक्षेबाबत लोकांचे लक्ष खूप कमी आहे. मी पंडित जवाहरलाल नेहरुंचा खूप आदर करतो. पण कदाचित त्यांची कमजोरी होती की त्यांना वाटयचे की शांतीदूत बनावे, कबूतरे उडवावी. यामुळे देश कमकुवत झाला आहे आणि खूप वेळापर्यंत हे सुरुच होते़ १९९८ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी अणुबॉम्बची चाचणी केली. तो अणुबॉम्ब २० वर्षापासून तसाच ठेवला होता.

सरकार घाबरायचे पण आमच्या वाजपेयीजींनी चाचणी घडवून आणली. जगाने आपल्यावर निर्बंध आणले पण अटलजींना आपल्या देशातल्या नागरिकांवर विश्वास होता. मी आपल्या सैनिकांनादेखील सांगतो जसा आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे तसाच तुम्हालाही आमच्यावर विश्वास असायला हवा की देश तुमच्या सोबत आहे, असे राज्यपालांनी यावेळी म्हटले. देशात आपल्याला शांततेचे वातावरण हवे आहे. आपण कोणालाही शत्रू मानत नाही. दुसरीकडे आपल्याला शत्रू माननाºया लोकांनी ४ बाजूंनी आपण घेरले गेलो आहोत असेही राज्यपाल म्हणाले.

मोदींच्या हातात देश सुरक्षीत
त्रिशूलमध्ये असताना विमानतळ सुरु नसल्याचे पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले होते. पण कालपरवा बातमीतपत्रात पाहिले की लडाखमध्ये ४ विमानतळे उभी राहत आहेत. मला वाटले की मला पद्मविभूषण मिळत आहे. कारण सीमेवर हे गरजेचे आहे. हे इतके वर्ष झाले नाही पण आता मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे, असे राज्यपाल म्हणाले.

राज कुंद्राच्या कंपनीतील ४ कर्मचारी मुख्य साक्षीदार!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या