24 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयमालकाच्या मृत्यूने गायीने फोडला हंबरडा

मालकाच्या मृत्यूने गायीने फोडला हंबरडा

एकमत ऑनलाईन

हजारीबाग : असे म्हणतात की प्रेमाची कोणतीही भाषा किंवा व्याख्या नसते, जी कोणाशीही बोलून व्यक्त होऊ शकते. प्रेम कोणत्याही जीवावर किंवा माणसावर होऊ शकते. सध्या सोशल मीडियावर गाय आणि मालकाच्या प्रेमाचा व्हिडिओ व्हायरल होत असून, जो पाहून प्रत्येकाचे हृदय हेलावून गेले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणा-या या व्हिडिओमध्ये एक गाय आपल्या मालकाच्या निधनावर शोकाकुल झालेली दिसून येत आहे. गायीला झालेले दु:ख तिच्या आवाजावरून स्पष्ट दिसत आहेत. ते ऐकून कोणाचेही हृदय पिळवटून जाईल आणि डोळे पाणवतील.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ झारखंडमधील हजारीबागमधील चौपारण भागातील असल्याचे सांगण्यात येत आहे. या व्हिडिओमध्ये मालकाच्या मृत्यूनंतर एक गाय त्याच्या शेवटच्या दर्शनासाठी सैरभैर झाल्याचे दिसत आहे.

गायीने केले अंत्यसंस्कार
निधन झालेल्या व्यक्तीला मूल नव्हते त्यामुळे त्याने या गायीला लहानाचे मोठं केले होते. मात्र, काही आर्थिक अडचणींमुळे त्याने ते विकले होते. त्यामुळे या गायीला तिच्या सांभाळ केलेल्या मालकाचे निधन झाल्याचे कसं समजले याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समजलेली नाही. मालकावरील गायीचे प्रेम पाहून गावक-यांनी गायीकडून या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करून घेतले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या