27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeराष्ट्रीयमगरीने ८ वर्षांच्या मुलाला अख्खे गिळले

मगरीने ८ वर्षांच्या मुलाला अख्खे गिळले

एकमत ऑनलाईन

श््योपूर : मध्य प्रदेशातील श््योपूरमध्ये गावक-यांनी मगरीला पकडून बाहेर काढले. त्यानंतर मगरीला दोरीने बांधून तोंडात काठी अडकवली. मगरीला ८ वर्षाच्या मुलाला जिवंत गिळताना एका रहिवाशाने पाहिले होते. मुलाला पोटातून बाहेर काढेपर्यंत मगरीला सोडणार नसल्याची भूमिका गावक-यांनी घेतली होती.

रिजेटा गावातील लक्ष्मण सिंह केवट यांचा ८ वर्षांचा मुलगा अतार सिंग चंबळ नदीवर आंघोळीसाठी गेला होता. आंघोळ करत असताना मगरीने त्याच्यावर हल्ला केला. मगरीने मुलाला ओढून नदीत नेले. गावक-यांनी मगरीला जाळ्यात अडकवून दोरीने बांधून नदीबाहेर काढले आणि बांधून ठेवले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या