26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeराष्ट्रीयनैसर्गिक आपत्तीच्या धोक्याचे पुर्वसंकेत मिळणार

नैसर्गिक आपत्तीच्या धोक्याचे पुर्वसंकेत मिळणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : गत काही काळात उष्णतेची लाट, अतिवृष्टी, दुष्काळ, चक्रीवादळे, महापूर अशा अनेक नैसर्गिक संकटांचा सामना जगातल्या वेगवेगळ्या प्रदेशांना करावा लागतो आहे. भारतही त्यातून सुटलेला नाही. गेल्या काही महिन्यांतच आपण अशी विविध नैसर्गिक संकटे अनुभवली असून, या पार्श्वभूमीवर, उष्णतेच्या लाटेचे पूर्वानुमान देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशयल इंटेलिजन्सवर आधारित एक मॉडेल तयार करण्यात आले आहे. सनी लाइव्ह्ज असे, त्या मॉडेलचे नाव आहे. मायक्रोसॉफ्ट इंडिया आणि सस्टेनेबल एन्व्हायर्न्मेंट अँड इकॉलॉजिकल डेव्हलपमेंट सोसायटी या दोन्ही संस्थांनी एकत्र येऊन हे मॉडेल विकसित केले आहे.

भारतातल्या संभाव्य उष्णतेच्या लाटांचे पूर्वानुमान वर्तवण्याची क्षमता या मॉडेलमध्ये आहे. चक्रीवादळे आणि महापुरासारख्या अन्य नैसर्गिक संकटांचे पूर्वानुमान वर्तवण्यासाठी या मॉडेलचा याआधी वापर करण्यात आला आहे. मायक्रोसॉफ्टच्या प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, २०२१ मध्ये नैसर्गिक आपत्तींचा अंदाज आधीच वर्तवून धोका असलेल्या सुमारे सव्वा लाख नागरिकांना सा करणे हे नव्या मॉडेलचे उद्दिष्ट आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर मॅनिटॅरियन अ‍ॅक्शन या जागतिक उपक्रमांतर्गत हे नवे मॉडेल विकसित करण्यात आले आहे. त्याचा उपयोग भारतातल्या नैसर्गिक आपत्तीचा धोका असलेल्या नागरिकांना सा करण्यासाठी होणार आहे. दुस-या टप्प्यात शहरी भागातल्या उष्णता लाटप्रवण भागातल्या संभाव्य धोक्यांचे पूर्वानुमान देण्यासाठी मॉडेल विकसित केले जाणार आहे.

हीटवेव्हची तीव्रता मोजण्यात सक्षम
हवामानबदलाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, भारतासह जगभरातल्या कोअर हीटवेव्ह झोन्समध्ये हीटवेव्ह अर्थात उष्णतेच्या लाटेच्या धोक्यातही वाढ होत आहे. येत्या काही दशकांत त्यात आणखी वाढ अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर हे मॉडेल विकसित करण्यात आले आहे.

संभाव्य धोक्याचा अंदाज बांधता येणार
उपग्रहाने टिपलेल्या उच्च क्षमतेच्या दर्जेदार प्रतिमा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोडिंग आणि नागरी वस्तीच्या प्रदेशांचे मूल्यमापन आदी बाबींचा उपयोग करून हे मॉडेल संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा जास्तीत जास्त अचूक अंदाज वर्तवू शकते. भूकंप, वादळे, वणवे आणि जैविक संकटांचे पूर्वानुमान वर्तवण्याच्या दृष्टीनेही या मॉडेलचा उपयोग करून घेता येऊ शकतो.

दिल्ली, नागपुरात प्रात्यक्षिक यशस्वी
मायक्रोसॉफ्टच्या प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, २०२१ मध्ये या मॉडेलच्या साह्याने दिल्ली आणि नागपूरमधल्या ५० हजार नागरिकांना आगामी उष्णतेच्या लाटेचा अंदाज आधीच देण्यात आला होता.

प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या