23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeराष्ट्रीयआईच्या पार्थिवाला खांदा देणाऱ्या 5 मुलांचाही मृत्यू, सहाव्याची प्रकृती गंभीर

आईच्या पार्थिवाला खांदा देणाऱ्या 5 मुलांचाही मृत्यू, सहाव्याची प्रकृती गंभीर

एकमत ऑनलाईन

झारखंड : कोरोना व्हायरसने देशभरात मोठं थैमान घातलं आहे. अशातच झारखंडच्या धनाबाद येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्याने आतापर्यंत एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 7 व्या सद्यस्याची प्रकृती गंभीर आहे. खात्रीलायक सुत्रांच्या माहितीनुसार कोरोनामुळं मृत्यूमुखी पडलेल्या जन्मदात्या आईच्या पार्थिवाला पाच मुलांनी खांदा दिला होता.

अंत्यविधी पार पडल्यानंतर काही दिवसांनी या पाचही जणांना कोरोनाची लागण झाली आणि त्यांचाही कोरोनामुळं मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली असून आतापर्यंत या कुटुंबातील जवळपास 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सातव्या व्यक्तीची प्रकृती सुद्धा चिंताजनक आहे. मिळालेल्या माहितीनुसार झारखंडच्या धनाबाद येथे राहणारी 90 वर्षीय वृद्ध महिला आपल्या नातवाच्या लग्नाला उपस्थित होण्यासाठी 27 जून रोजी धनबाद येथून दिल्लीला गेली होती.

तेथे अचानक त्यांची प्रकृती खालावू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यादरम्यान त्यांची कोरोना तपासणीही करण्यात आली त्यात त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर या महिलेला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात उपचार सुरू असतांना या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले, यावेळी सदरील महिलेच्या पाच मुलांनी अंत्यविधी पार पाडला.

मात्र दोन दिवसानंतरच मृत महिलेच्या दोन मुलांना कोरोनाची लागण झाली. आणि रुग्णालयात उपचार सुरू असतांना त्यांचा अचानक मृत्यू झाला. त्यानंतर अंत्यविधीस हजर असलेल्या इतर 4 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता. त्यापैकी तीन जणांचा उपचार सुरू असतांना मृत्यू झाला तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. अशा प्रकारे 15 दिवसांच्या आत कोरोना विषाणूच्या साथीमुळे एकाच कुटुंबातील 6 जणांना आपला जीव गमवावा लागला.

आईसीएमआरने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे या कुटुंबातील व्यक्तींनी मृत महिलेचा अंत्यसंस्कार जर काळजीपुर्वक आणि सावधगिरी बाळगून केला असता तर इतरांना कोरोनाची लागण होऊन जीव गमवावा लागला नसता असं आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

Read More दुधाचा प्रतिकात्मक अभिषेक घालून राजू शेट्टी यांनी केली आंदोलनास सुरूवात

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या