23.1 C
Latur
Monday, August 2, 2021
Homeआंतरराष्ट्रीयव्हॅक्सिन पासपोर्टची मागणी भेदभाव निर्माण करणारी

व्हॅक्सिन पासपोर्टची मागणी भेदभाव निर्माण करणारी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जगभर फैलावलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक युरोपीय देशांकडून व्हॅक्सिन पासपोर्टचा प्रस्ताव समोर ठेवण्यात आला आहे. मात्र, भारत सरकारने या प्रस्तावित व्हॅक्सिन पासपोर्टला भेदभावजनक म्हणत आपला विरोध व्यक्त केला आहे. व्हॅक्सिन पासपोर्ट याचाच अर्थ परदेश प्रवासासाठी लस घेणे अनिवार्य राहील.

जी ७ मंत्रिस्तरीय बैठकीत भारताचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी भारताचे म्हणणे इतर देशांसमोर मांडले. सात विकसित देशांच्या या बैठकीत भारताला यंदाच्या वर्षात अतिथीच्या स्वरुपात आमंत्रित करण्यात आले होते. जी ७ अर्थात ग्रुप आॅफ सेवनमध्ये कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन आणि अमेरिका या देशांचा समावेश होतो.

व्हॅक्सिन पासपोर्टची मागणी जगभर अत्यंत भेदभाव निर्माण करणारी ठरू शकते, असे डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे. तसेच, विकसनशील देशांत कोरोना लसींची उपलब्धता आणि लसींच्या किंमतीविषयी डॉ. हर्षवर्धन यांनी चिंता व्यक्त केली आहे.

विकसनशील देशांत लसीकरणाचा दर कमी
विकसीत देशांच्या तुलनेत विकसनशील देशांत लसीकरणाचा दर कमी आहे. हे ध्यानात घेऊनंतर व्हॅक्सिन पासपोर्टची मागणी योग्य ठरणार नाही. विकसनशील देशांसाठी व्हॅक्सिन पासपोर्ट अत्यंत भेदभावजनक आणि नुकसानकारक ठरू शकतो, असे आम्हाला वाटते. विकसनशील देशांसाठी सध्या लसीकरणाला प्रोत्साहन देणे आणि लसीकरण सुरळीत-मजबूत करणे जास्त गरजेचे आहे, असेही यावेळी भारताच्या आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

जी ७ समन्वय वाढवणार
शुक्रवारी ब्रिटनमध्ये जी ७ आरोग्य मंर्त्यांच्या बैठकीत भविष्यातील साथीचे रोग तसेच इतर धोक्­यांविरुद्ध समन्वय वाढवण्यावर सर्व देशांनी सहमती दर्शविली. परंतु विकसनशील, अविकसीत देशांमध्ये लसीच्या वितरणाला गती देण्यासाठी कोणत्याही नवीन प्रतिबद्धतेची आखणी करण्यात आलेली नाही. कोविड १९ आणि भविष्यातील आरोग्य संबंधीत समस्यांवर मात करण्यासाठी लस आणि वैद्यकीय चाचण्यांचे परिणाम सामायिक करणे तसेच, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान करणे हेच या कराराचे उद्दीष्ट आहे, असा उल्लेख मंत्र्यांच्या संयुक्त घोषणेत करण्यात आला आहे.

देशात गेल्या २४ तासांत १,२०,५२९ नव्या बाधितांची नोंद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या