26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeराष्ट्रीयकोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढले

कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढले

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोना लसीचे दोन डोस घेणे अनिवार्य आहेत. कोरोनाच्या दोन डोसमध्ये किमान २८ दिवसांचे म्हणजे ४ आठवड्यांचे किंवा ६ आठवड्यांचे अंतर असते. पण आता हे अंतर वाढवण्यात आले आहे. आता कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर ४ नाही तर १२ ते १६ आठवड्यांपर्यंत तुम्हाला कोरोना लसीचा दुसरा डोस घेता येईल. पण हा नियम फक्त कोविशिल्ड कोरोना लसीसाठीच लागू असेल.

सीरम इंस्टिटयूटच्या कोविशिल्ड कोरोना लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवावे अशी शिफारस सरकारच्या नॅशनल टेक्निकल अ­ॅडव्हायजरी ग्रुप अर्थात एनटीएजीआयने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे केली होती. ही शिफारस मान्य करण्यात आली आहे. त्यानुसार कोविशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर १२ आठवडे ते १६ आठवड्यांपर्यंत तुम्हाला कोरोना लसीचा दुसरा डोस घेता येईल.

कोरोनामधून बरे झाल्यावर ९० दिवसांनी लस घ्यावी
एनटीएजीआयच्या शिफारशीपूर्वी, आतापर्यंत कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर, दुसरा डोस ६ ते ८ आठवड्यांमध्ये घेण्याचे सांगण्यात आले होते़ परंतु आता कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. डॉक्टरांनी कोरोनामधून रिकव्हर झाल्यानंतर तीन महिन्यांनी लस घेण्याचा सल्ला दिला होता. तसेच, सीडीसी यूएसच्या गाइडलाइन्समध्येही कोरोनामधून रिकव्हर झाल्यानंतर ९० दिवसांनी लस घेण्याचा सल्ला देण्यात आला होता, ज्यात अद्याप कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

लोकसंख्येत २०२७ पूर्वीच भारत चीनला मागे टाकणार; संयुक्त राष्ट्राचा अहवाल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या