नवी दिल्ली : अमेरिकेत पुढील वर्षी होणा-या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वीच बोईंग कंपनीने एअर इंडियासोबत २.८१ लाख कोटी रुपयांचा २२० विमानांचा करार केला आहे. या सौदातील महत्त्वाची बाब ही आहे की, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मध्यमवर्गीयांना लक्षात घेऊन ४४ राज्यांतील नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे, असा दावा केला. विशेष म्हणजे ते म्हणाले की, या निवडणूकीसाठी महाविद्यालयीन पदवी अनिवार्य नसणार आहे.
महत्त्वाची बाब अशी आहे की बायडेन यांचा हा डाव अमेरिकनांपेक्षा तिथे राहणा-या भारतीयांसाठी अधिक फायदेशीर ठरणार आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे अमेरिकन विद्यार्थ्यांचे अभ्यासातील मागासलेपण. न्यू स्टॅनफोर्डच्या संशोधनानुसार, २०२२-२३ मध्ये १२ वीपर्यंतच्या वर्गांमध्ये सुमारे १२ लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश कमी झाले आहे. अमेरिकेतील केवळ एक चतुर्थांश शिक्षितांकडे महाविद्यालयीन पदवी आहे.
२.५ लाख भारतीय विद्यार्थी पदवीधर
सुमारे २.५ लाख भारतीय विद्यार्थी दरवर्षी अमेरिकेत ४ वर्षांचा पदवी अभ्यासक्रम घेतात. नंतर त्यांना त्याच नोक-या मिळतात. या सर्व परिस्थितीत अमेरिकन उत्पादन क्षेत्राबद्दल अमेरिकन लोकांचा भ्रमनिरास होत आहे. तर, बोईंग डीलद्वारे, बायडेन यांनी मध्यवर्गीय अमेरिकन लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे म्हणत मत मिळविण्याची रणनीती आखली आहे.
भारत कुशल मनुष्यबळाची गरज भागवतो
बोइंगच्या प्रवक्त्या जेसिका केवेल यांनी दिव्य मराठीशी संवाद साधताना सांगितले की, कंपनीला अक क्षेत्रात कुशल कर्मचा-यांची गरज आहे. बोईंगमध्ये ५०० अत्यंत कुशल अभियंते आणि २०० तांत्रिक कामगार या वर्षी निवृत्त होत आहेत. अमेरिकेतील इतर तंत्रज्ञान उद्योगातून बाहेर काढलेल्या भारतीयांनाच येथे रोजगार मिळत आहे.
२१ लाख पदे रिक्त असतील
उत्पादन क्षेत्राबद्दल अमेरिकन लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. २०३० पर्यंत वर उत्पादन क्षेत्रात २.१ दशलक्ष रिक्त पदे असतील. बोईंगच्या सेंट लुईस मुख्यालयात निवृत्त होणा-या कर्मचा-यांपेक्षा नवीन गोरे कर्मचा-यांची संख्या नसल्याच जमा आहे. मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे सीईओ जे टिमन्स म्हणाले की, या ठिकाणी भारतीय कुशल व्यावसायिकांची संख्या सातत्याने वाढत आहे.