बद्रीनाथ धाम : उत्तराखंडची चारधाम यात्रा २२ एप्रिलपासून सुरू झाली आहे. यात्रेचे चौथे धाम असलेल्या बद्रीनाथचे कपाट उघडले. बद्रीनाथ धाम १५ क्विंटल झेंडूच्या फुलांनी सजवण्यात आले आहे. बद्रीनाथ धामच्या बाहेर सकाळपासून बर्फ पडत आहे. त्यानंतरही शेकडो भाविक मंदिराबाहेर दर्शनासाठी जमा झाले आहेत.
यावेळी लष्कराच्या बँडची धून वाजत होती आणि लोकांनी जय बद्री विशालच्या घोषणा दिल्या. तत्पूर्वी आदिगुरू शंकराचार्यांची गादी नरंिसह मंदिरातून पांडुकेश्वरला निघाली होती. याआधी २५ एप्रिल रोजी सकाळी ६.२० वाजता केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्यात आले होते. मंदिराचे मुख्य पुजारी जगद्गुरू रावल भीम शंकर लिंग शिवाचार्य यांनी मंदिराचे दरवाजे उघडले.
मंदिराला २० क्विंटल फुलांनी सजविण्यात आले होते. खराब हवामानामुळे मंदिरात जाणा-या हजारो भाविकांना पुढे जाण्यापासून रोखण्यात आले होते. मात्र, पहिल्या दिवशी आठ हजारांहून अधिक भाविकांनी बाबांचे दर्शन घेतले. उणे ६ अंश तापमानानंतरही दर्शनासाठी पहाटे ४ वाजल्यापासून मंदिराबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.