नवी दिल्ली : देशासह जगभरात गेल्यावर्षीपासून कोरोना विषाणू संसर्गाने कहर केला आहे. भारतात सध्या कोरोनाचा प्राुदर्भाव बराचसा नियंत्रणात आला आहे. तसेच लसीकरणालाही वेग आला आहे. त्यामुळे कदाचित काही दिवसांत कोरोनाचा संसर्ग संपण्याचीही शक्यता आहे. मात्र कोरोनाच्या संकटाचे परिणाम दीर्घकाळापर्यंत माणसांवर विशेषत: लहान बालकांवर राहणार असल्याची माहिती सीएसईच्या अहवालात समोर आली आहे.
सेंटर फॉर सायन्स अॅण्ड एन्वायरन्मेंट (सीएसई) च्या देशभरातील ६० पर्यावरणतज्ज्ञांनी मिळून त्यांच्या कोरोना संसर्गाच्या दीर्घकालिन परिणामांबाबतचा अहवाल प्रकाशित केला आहे. त्यात कोरोनासंसर्गामुळे झालेले मृत्यू ही केवळ एका किंवा दुसºया वर्षासाठीच चिंतेची बाब नसून त्याचे दीर्घकालिन परिणाम राहणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेषत: लहान मुलांवर होणारे परिणाम गंभीर असून मुलांच्या शारीरीक विकासावर मर्यादा पडतील, असे मत मांडण्यात आले आहे. एवढेच नव्हे लहान मुलांचा मृत्यूचा दरातही मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. भारतातील ३७.५ कोटी लहान मुलांवर या महामारीचे दीर्घकालिन परिणाम होण्याची शक्यता आहे. रोगप्रतिकारक क्षमता घटणे, शारीरीक उंची, वाढ व वजनात घट होण्याची शक्यता आहे.
शिक्षणावरही परिणाम होणार आहे. कोरोना संसर्गानंतर जगभरात ५० कोटींपेक्षा अधिक मुले शाळेपासून वंचित राहिले आहेत. त्यातील अर्ध्यापेक्षा अधिक मुले भारतातील आहेत, असे सांगितले आहे.
पोषण आहार बंद झाल्याने परिणाम
युनिसेफनेही कोरोनामुळे लहानग्यांवरील परिणामांबाबत मोठी चिंता व्यक्त केली आहे. भारतातील पोषक आहार व्यवस्थापनामुळे गरीब घरांमधील मुलांनी शिक्षणाबरोबरच सर्वांगीण वाढीचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र लॉकडाऊनमध्ये ही सर्व मुले पुन्हा पोषण आहारापासून वंचित झाली आहेत. अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव संपुर्णपणे केव्हा संपणार याबाबत अनिश्चितता असल्याने या मुलांची शिक्षण व पोषण आहाराची समस्या गंभीर बनल्याचे युनिसेफचे म्हणणे आहे.
शाळाबाह्य मुलांची संख्या घटविण्याबाबत लक्ष्य असाध्य
केंद्रसरकारने विविध उपक्रमांच्या माध्यमातून २०३० पर्यंत शाळाबाह्य मुलांचे प्रमाण एकुण मुलांच्या २.५ टक्क्यांपर्यंत आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे. २०१८ मध्ये हे प्रमाण सुमारे ३७.५ टक्के होते. जर कोरोनाचा संसर्ग झाला नसता तर हे लक्ष्य केंद्रसरकारला साध्य करता आले असते. मात्र आता ते साध्य होणे अशक्य असल्याचेही सीएसईच्या अहवालात म्हटले आहे.
डब्ल्यूएचओने मानले नरेंद्र मोदींचे आभार