22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeराष्ट्रीयदुस-या लाटेला निवडणूक आयोग जबाबदार

दुस-या लाटेला निवडणूक आयोग जबाबदार

एकमत ऑनलाईन

चेन्नई : कोरोनाच्या दुस-या लाटेला निवडणूक आयोगच जबाबदार असून आयोगाच्या अधिका-यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, असा संताप मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजीव बॅनर्जी यांनी एका सुनावणीवेळी व्यक्त केला.

देशभरात कोरोनाची दुसरी लाट येत असल्याची माहिती असतानाही निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना निवडणूक रॅली काढण्यास परवानगी दिली. त्यामुळे आज देशातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. याला निवडणूक आयोगच जबाबदार असल्याचे बॅनर्जी यांनी म्हटले आहे. दरम्यान, येत्या २ मे रोजी पाच राज्यांच्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे.

या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाने कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्यासाठी योग्य धोरण आखले नाही तर मतमोजणी थांबवू, असा इशारा न्यायालयाने दिला आहे. ३० एप्रिलपर्यंत मतमोजणीसाठी कोविड प्रोटोकॉलबाबत काय उपाययोजना करणार आहेत, त्याची माहिती देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

तसेच लोकांचे आरोग्य सर्वात महत्त्वाचे आहे. संवैधानिक पदांवरील लोकांना अशा गोष्टींचे स्मरण करुन द्यावे लागते हे दुर्देव आहे. जेव्हा एखादा व्यक्ती जिवंत असेल तरच तो त्याच्या लोकशाही अधिकारचा लाभ उठवू शकेल ना? असा संतप्त सवालही न्यायालयाने केला आहे.

आता घरातही मास्क लावावे लागणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या