नवी दिल्ली : केंद्रीय मनुष्यबळ आणि संसाधन मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आज देशभरातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. दरम्यान लॉकडाऊनमुळे स्थगित करण्यात आलेल्या जेईई, जेईई मेन, नीट सोबत सीबीएसई परीक्षांच्या तारखेबद्दल अधिकृत माहिती समोर आली आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट १७ जुलै रोजी होणार असल्याची घोषणा नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आज (गुरुवारी) केली. नीट परीक्षेची नोंदणी बुधवारपासून सुरू झाली. जेईई मेन ही अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी असलेली प्रवेश परीक्षा जून आणि जुलैमध्ये घेतली जाईल, असेही एनटीएने सांगितले.
नीट परीक्षा देशभरातील केंद्रांवर १३ भाषांमध्ये होणार आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ६ मे आहे. तर विद्यार्थ्यांनी ठळअ वेबसाईटवर माहिती जाणून घ्यावी. तसेच सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. सूचनांचे पालन न करणा-या विद्यार्थ्यांना सरसकट अपात्र ठरवले जाईल, असे ठळअ अधिका-यांनी स्पष्ट सांगितले.