27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeराष्ट्रीयअयोध्या रेल्वे स्टेशनचाही चेहरामोहरा बदलणार; मंदिराच्या प्रतिकृतीप्रमाणं होणार पुनर्बांधणी

अयोध्या रेल्वे स्टेशनचाही चेहरामोहरा बदलणार; मंदिराच्या प्रतिकृतीप्रमाणं होणार पुनर्बांधणी

एकमत ऑनलाईन

अयोध्या – राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यानंतर प्रत्यक्ष मंदिर उभारणीला सुरुवात होईल. दरम्यान, भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरु आहे. सर्व सार्वजनिक ठिकाणं नव्या रुपात-ढंगात सजली आहेत. यात आता आणखी एका ठिकाणाची भर पडणार आहे, ती म्हणजे रेल्वे स्टेशनची. आता अयोध्येच्या रेल्वे स्टेशनचा चेहरामोहरा बदलण्यात येणार आहे. राम मंदिराच्या प्रतिकृतीच्या रुपात या रेल्वे स्टेशनची पुनर्बांधणी केली जाणार आहे. यासाठी रेल्वे मंत्रालयानं निधीमध्येही भरघोस वाढही केली आहे.

प्रत्यक्ष राम मंदिर तयार होण्यापूर्वीच पुढील दोन वर्षात अयोध्यावासियांना मंदिराच्या प्रतिकृती स्वरुपात रेल्वे स्टेशन मिळणार आहे. या स्टेशनच्या पुनर्विकासासाठी रेल्वेने बजेटमध्ये वाढ केली असून ८० कोटींवरुन ती १०४ कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. रेल्वेच्या अधिका-यांनी सांगितलं की, हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहे.
यासंदर्भात रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी रविवारी ट्विट केलं होतं. यात त्यांनी म्हटलं, ‘‘करोडो लोक राम मंदिराला भेट देण्यासाठी येतील. त्यामुळे रेल्वे मंत्रालयानं पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अयोध्या स्टेशनचा पुनर्विकास करण्याचं ठरवलं आहे.’’

सध्याचं अयोध्या स्टेशनची रचना ही देखील मंदिराप्रमाणेच आहे. काही वर्षांपूर्वीच त्याच्या पुनर्विकासाचा निर्णय झाला होता. त्यानंतर आता याचं नवं डिझाईन नव्या राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर असणार आहे. त्याचबरोबर यामध्ये प्रवाशांच्या सोयीसुविधांबरोबरच मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी हाताळण्यासाठी क्षमताही वाढवण्यात येणार आहेत.

या रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास दोन टप्प्यात केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात स्टेशनमधील प्लॅटफॉर्मचा भाग विकसित केला जाईल. त्यानंतर दुस-या टप्प्यात स्टेशनच्या नव्या इमारतीचं बांधकाम सुरु होईल. यामध्ये अनेक टॉयलेट्स, डॉर्मिटरीज, तिकीट खिडक्या आणि मोकळी जागा असणार आहे.

Read More  उमा भारती अयोध्येत; भूमिपूजनाला मात्र अनुपस्थितीत राहणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या