23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeराष्ट्रीयशेतक-याला सापडली द्वापार युगातील हत्यारे

शेतक-याला सापडली द्वापार युगातील हत्यारे

एकमत ऑनलाईन

मैनपुरी : उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे एका शेतक-याला शेत जमीन सपाट करताना हजारो वर्षे जुनी शस्त्रे सापडली. तलवारी, सुरे, त्रिशूळ, भाले, अशी तांब्यापासून बनवलेली ही शस्त्रे आहेत. स्थानिक पोलीस आणि भारतीय पुरातत्व विभागाने हे शस्त्र सापडलेले ठिकाण सील केलं आणि शस्त्रे ताब्यात घेतली.

मैनपुरी जिल्ह्यातील गणेशपूर गावात ही शस्त्रे आढळली आहेत. येथील शेतकरी बहादूरसिंग फौजी शेतात मातीचा ढिगारा सपाट करत होते. यादरम्यान, जमिनीतून मातीचे लेप असलेली शस्त्रे आढळली.

आणखी उत्खनन केले असता धातूची ३९ शस्त्रे बाहेर आली. शेतक-याने ही हत्यारे सोने-चांदी म्हणून आपल्या घरी नेली. मात्र शेतात शस्त्रे सापडल्याची माहिती संपूर्ण गावात वा-यासारखी पसरली.

४००० वर्षे जुनी शस्त्रे
ही शस्त्रे पाहून पुरातत्व तज्ञांचीही उत्सुकता वाढली आहे. तांब्याच्या शस्त्रांच्या तपासणीनंतर आलेल्या संशोधनाच्या निष्कर्षांमुळे पुरातत्वशास्त्रज्ञ खूपच रोमांचित झाले आहेत. प्राचीन काळातही भारतीय सैनिकांकडे प्रगत शस्त्रे होती. द्वापार काळातील ही शस्त्रे असल्याचे तज्ञ सांगत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या