25.4 C
Latur
Monday, March 1, 2021
Home राष्ट्रीय शेतकरी मोर्चा रोखण्याचा आदेश देणार नाही

शेतकरी मोर्चा रोखण्याचा आदेश देणार नाही

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : नव्या कृषि कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणारे शेतकरी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली काढणार आहेत. शेतक-यांना दिल्लीत प्रवेश देण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार दिल्ली पोलिसांना असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले होते. त्यानंतर आज बुधवारी झालेल्या सुनावणीत याप्रकरणी कोणताही आदेश देण्यास नकार दिला.

नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनी प्रस्तावित ट्रॅक्टर रॅलीसंबंधी आम्ही कोणताही आदेश देणार नाही. याप्रकरणी पोलिसांनी निर्णय घ्यायचा आहे,असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. कोणत्याही मेळावा किंवा मिरवणुकीस अनुमती देणे किंवा न देणे हा पोलिसांचा मुद्दा आहे. पोलीस याप्रकरणी निर्णय घेतील. आम्ही कोणताही आदेश देणार नाही,असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
दिल्ली पोलिसांनी निर्णय घ्यावा

केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाचा सोहळा सुरु असताना मोर्चा न काढण्याचा आदेश शेतक-यांना द्यावा अशी मागणी करणारी याचिका केंद्र सरकारकडून करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने आपली भुमिका स्पष्ट केली. यासंदर्भात न्यायालयाने केंद्राला याचिका मागे घेण्याची परवानगी दिली असून दिल्ली पोलिसांना निर्णय घेण्यास सांगितले आहे.

एलओसीवर ३ दहशतवाद्यांचा खात्मा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या