22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeराष्ट्रीयवडिलाने सज्ञान मुलाला शैक्षणिक खर्च द्यावाच लागणार

वडिलाने सज्ञान मुलाला शैक्षणिक खर्च द्यावाच लागणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : मुलगा सज्ञान झाला म्हणून वडील त्याच्या शैक्षणिक खर्चाला नकार देऊ शकत नाहीत, असा महत्वपूर्ण निकाल दिल्ली उच्च न्यायालयाकडून देण्यात आला आहे. मुलाचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याच्या उच्च शिक्षणाचा खर्च करू शकणार नाही, अशी याचिका एका व्यक्तीने दाखल केली होती. ही दाखल करण्यात आलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

जोपर्यंत मुले स्वत:ला पोसण्याइतपत सक्षम होत नाहीत, तोपर्यंत वडिलांनी त्याच्या शिक्षणाचा आर्थिक भार उचलणे अनिवार्य आहे. मुलाचे वय १८ वर्ष झाले म्हणून त्याच्या आईवरदेखील शिक्षणाचा आर्थिक भार टाकू नये, असे निकाल देताना न्यायालयाने नमूद केले आहे. मुलाने वयाची १८ वर्षे पूर्ण केली की, तो सज्ञान झाल्याने वडील म्हणून त्याच्या शिक्षणाची जबाबदारी झटकू शकत नाहीत. मुलगा सज्ञान असला तरी तो आर्थिकदृष्ट्या सक्षम असेलच असे नाही. तसेच तो स्वत: पोसेल इतका सक्षम असेल असे नाही.

मदत करण्याची वडिलांची जबाबदारी
मुलांची आई जर मुलांवर खर्च करत असेल आणि आईच्या हातात किरकोळ रक्कम राहत असेल तर आईला मदत करण्याची वडिलांची जबाबदारी आहे, असे न्यायमुर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांनी सुनावणी दरम्यान सांगितले आहे. दरम्यान, याचिकाकर्त्यांचे नोव्हेंबर १९९७ मध्ये लग्न झाले होते आणि त्यांचा घटस्फोट झाला होता. या दोघांनाही आता २० वर्षांचा मुलगा आणि १८ वर्षांची मुलगी आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या