24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीयओमिक्रॉनच्या बीए-५ उपप्रकाराचा भारतात, तेलंगणामध्ये आढळला पहिला रुग्ण

ओमिक्रॉनच्या बीए-५ उपप्रकाराचा भारतात, तेलंगणामध्ये आढळला पहिला रुग्ण

एकमत ऑनलाईन

हैदराबाद: सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून सर्व निर्बंध शिथील झालेले आहेत. मात्र आता तेलंगणा राज्यात ओमिक्रॉन विषाणूचा उपप्रकार बीए-५ ची लागण झालेला एक रुग्ण सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही व्यक्ती ८० वर्षीय असून त्याचा आंतरराष्ट्रीय प्रवासाचा कोणताही इतिहास नाही. विशेष म्हणजे या व्यक्तीने करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले होते. जिनोम सिव्वेंसिंग करणा-या संस्थेने याची पुष्टी केली आहे.

ओमिक्रॉम विषाणूचा उपप्रकार बीए-५ ची लागण झालेल्या तेलंगणा येथील व्यक्तीला सध्या सौम्य लक्षणे जाणवत आहेत. याआधी ओमिक्रॉनच्या बीए-४ आणि बीए-५ या उपप्रकारांमुळे दक्षिण आफ्रिकेत करोनाची पाचवी लाट आली होती. त्यांतर या उपप्रकराचा फैलाव युनायटेड स्टेट्स तसेच युरोपीय देशांमध्ये पसरला होता. याच कारणामुळे युरोपीय रोग नियंत्रण आणि प्रतिबंध विभागाने ओमिक्रॉनच्या बीए-५ या उपप्रकाराला चिंताजनक म्हटलं आहे तसेच जागतिक आरोग्य संघटनेनेही या उपप्रकाराला दखलपात्र आणिचिंताजनक असल्याचे म्हणत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, या उपप्रकारामुळे रुग्णसंख्या वाढत असली तर रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण किंवा मृत्यूसंख्या वाढलेली नाही. भारतात मोठ्या प्रमाणात लसीकरण झालेले आहे. तसेच मागील करोना लाटांमध्ये नागरिकांमध्ये मिश्र रोगप्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे भारतात सध्या मृत्यूसंख्या वाढण्याची शक्यता नाही, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या