24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयहिरव्या बुरशीचा पहिला रुग्ण आढळला

हिरव्या बुरशीचा पहिला रुग्ण आढळला

एकमत ऑनलाईन

भोपाळ : पांढरी, काळी, पिवळी आणि आता हिरवी बुरशी कोरोना रुग्णांमध्ये आढळणा-या बुरशीच्या निरनिराळ्या प्रकारांनी आरोग्य विभागालाही हैराण केले आहे. मध्य प्रदेशात हिरव्या बुरशीचा पहिला रुग्ण समोर आला आहे. इंदूर शहरातील श्री अरविंदो इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये डिपार्टमेंट ऑफ चेस्ट डिसीजेसचे प्रमुख डॉ. रवि दोषी यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

नवा आजार हा अ‍ॅलर्जीचा प्रकार असून, याबद्दल अधिक अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. हे सर्वसाधारण संक्रमण नसून, त्याचा फुफ्फुसांवर दुष्परिणाम होऊ शकतो, असे दोषी यांनी म्हटले आहे़ हिरव्या बुरशीसहीत आढळलेल्या रुग्णाला एका एअर अ‍ॅम्ब्युलन्सच्या सहाय्याने इंदूरहून उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले आहे़ हिरवी बुरशी आढळलेला रुग्ण ३४ वर्षांचा आहे. या रुग्णाने जवळपास दोन महिने कोरोनाविरुद्ध लढा दिला. उपचारानंतर घरी परतल्यावर १०-१५ दिवसांनी अचानक एक दिवशी नाकातून रक्तस्राव आणि ताप जाणवल्याने या रुग्णाची पुन्हा चाचणी करण्यात आली.

ट्विटरने कायदेशीर संरक्षण गमावले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या