26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeराष्ट्रीयअधिवेशनाचा पहिला आठवडा गोंधळात

अधिवेशनाचा पहिला आठवडा गोंधळात

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दही-दुधासारख्या जीवनावश्यक पदार्थांवरील जीएसटीची कु-हाड, महागाई आदी मुद्यांवर राज्यसभेत सरकारने विरोधकांना अपेक्षित नियमांनुसार चर्चेला नकार दिल्याने झालेल्या गोंधळामुळे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यातील १८ तास ४४ मिनिटांचे कामकाज पाण्यात गेले.

राज्यसभेच्या पहिल्या आठवड्यातील कामकाजाची टक्केवारी २६.९० टक्क्यांवर घसरली. महागाईवर चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत, असे सरकार व विरोधक म्हणतात. पण त्याबाबत चर्चा करून एका निष्कर्षावर येऊन कामकाज सुरळीत करण्यास काय अडचण आहे? असा सवाल उपसभापती हरिवंश यांनी केला आहे. महागाईवर विरोधकांना गंभीर चर्चा करायचीच नाही.

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीकडून चौकशी सुरू झाल्याने त्याचा राग काँग्रेस सदस्य संसदेचे कामकाज ठप्प करून काढत आहेत, असा ठपका भाजपने ठेवला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना कोरोना झाला आहे. त्या ब-या होताच महागाईवर चर्चा घेऊ असे सभागृह नेते पीयूष गोयल यांनी सांगितले. मात्र गोयल यांचा पूर्वानुभव पाहता त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवणे कठीण नव्हे अशक्य आहे अशी विरोधी पक्षांची भूमिका आहे.

तीन दिवसांत १ तास १६ मिनिटे कामकाज
पावसाळी अधिवेशनातील पहिले तीन दिवस मिळून जेमतेम १ तास १६ मिनिटे जे कामकाज झाले. शून्य प्रहर, प्रश्नोत्तर तास, विधेयकावरील चर्चा हे प्रत्यक्ष कामकाज गोंधळामुळे झालेच नाही. बुधवारनंतर सरकारने रणनिती बदलली व कितीही गोंधळ सुरू असला तरी प्रश्नोत्तराचा तास घ्यायचाच हे सूत्र प्रत्यक्षात आणले. त्यामुळे प्रश्नोत्तराचा तास कागदोपत्री झाल्याचे दिसले. सचिवालयाने जी माहिती दिली त्यात या प्रकारच्या प्रश्नोत्तर तासाच्या १ तास ५० मिनिटांचाही कामकाजात (७५ पैकी २२ प्रश्न) समावेश केला आहे.

अगदी अखेरच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी प्रा. मनोज झा यांच्या आरोग्याचा अधिकार-२०२१ या एका खासगी विधेयकावर अडीच तास जी चर्चा झाली. तेच प्रत्यक्ष कामकाज राज्यसभेत झाले आहे. बेकायदेशीर कारवायांना निर्बंध हे सरकारी व ९ खासगी विधेयके सादर झाली. या विधेयकावर ४२ मिनिटे चर्चा झाल्यावर गोंधळामुळे कामकाज थांबवावे लागले.

राज्यसभेत नवीन नियम
गोंधळ सुरू झाला की घोषणा देणा-या सदस्यांची नावे लिहून ती दुस-या दिवशीच्या कामकाज इतिवृतात छापण्याचा नवा प्रघात राज्यसभेत सुरू झाला आहे. खुद्द सभापती वेंकय्या नायडू यांनीच ही सूचना केली होती. हौद्यात उतरून गोंधळ घालणारांची नुसती नावेच नव्हे तर, या सदस्यांनी सुरळीत कामकाज होऊ देण्यात अडथळे आणले, फलक फडकाविले, अशा आशयाची टीपदेखील जोडा, अशीही नायडू यांनी सचिवालयाला सूचना केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या