26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeराष्ट्रीयदहशतवाद्यांपेक्षा गांधी परिवारामुळे जास्त नुकसान

दहशतवाद्यांपेक्षा गांधी परिवारामुळे जास्त नुकसान

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : चित्रपट निर्माते अशोक पंडित हे काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर वारंवार टीकास्त्र सोडत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. अशोक पंडित यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून संताप व्यक्त करत राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. दहशतवादी संघटनांनीही एवढं नुकसान केले नाही जेवढे गांधी परिवाराने केले, असे म्हणत जोरदार टीका केली आहे.

राहुल गांधी, तुमचा पक्ष गिलानींच्या उपचारासाठी दिल्लीतल्या पंचतारांकित रुग्णालयावर कोट्यवधींचा खर्च करतो. गिलानी हे हजारो काश्मिरी हिंदूंच्या मृत्यूचे कारण ठरले आहेत. शत्रूंसोबत उभे राहणे हे तुमच्या रक्तातच आहे, असे देखील म्हटले आहे. अशोक पंडित यांनी स्टेन स्वामी यांच्या मृत्युवर भाष्य करत देखील टीका केली आहे. “स्टेन स्वामी हे दंगल घडवण्याप्रकरणी कैदेत होते.

पण प्रतिष्ठित वृत्तवाहिन्या, प्रतिष्ठित पत्रकारही या व्यक्तीला श्रद्धांजली देत आहेत. तो दिवस लांब नाही जेव्हा यासीन मलिकच्या निधनावरही श्रद्धांजली देतील, असेही म्हटले आहे. तसेच राहुल गांधी यांनीही आपल्या ट्विटमधून स्टेन स्वामी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यावरुन पंडित यांनी राहुल गांधीवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींचे एक ट्विट हे गेल्या ७० वर्षांमध्ये काँग्रेसने नक्षलवादाला केलेले समर्थन आणि पोषण दाखवून देते. हजारो सैनिक शहीद झाले, नक्षली गाव मागास राहिले आणि देशाच्या सुरक्षेलाही धोका निर्माण झाला आहे. हा सर्व चीनचा कट होता, असेदेखील अशोक पंडित यांनी म्हटले आहे़

राहुल गांधी खोटे बोलून अफवा पसरवतात
राहुल गांधी हे गैरसमज आणि अफवा पसरवण्याचे करत असून कोरोना लसीकरणाबाबत ते करत असलेली विधाने हा देशातील कोट्यवधी नागरिकांच्या जिवाशी खेळ आहे, अशी टीका शिवराज सिंह चौहान यांनी केली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत लसीकरण पुरवत आहेत आणि दुसरीकडे राहुल गांधी अफवा पसरवून देशातील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असेदेखील मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते़

आषाढी वारी प्रथा, परंपरेनुसार होणार; जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या