22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeराष्ट्रीयजीडीपी दर ९.५ टक्क्यांवर राहणार

जीडीपी दर ९.५ टक्क्यांवर राहणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जागतिक स्तरावरील पतमापन संस्था मुडीजने देशाच्या विकासदराचे उद्दिष्ट घटविल्यापाठोपाठ आणखी एक नामांकित पतमापन संस्था स्टॅण्डर्ड्स अँड पूवर्स अर्थात एस अँड पीने जीडीपी दराच्या उद्दिष्टात कपात केली आहे. याआधी एस अँड पीने चालू आर्थिक वर्षात ११ टक्के विकासदराचा अंदाज वर्तवला होता, मात्र आता जीडीपी दर ९.५ टक्के राहील, असे भाकीत सदर संस्थेने वर्तवले आहे.

कोरोना दुसºया लाटेचा मोठा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे, त्यामुळे अंदाजात कपात करावी लागत असल्याचे एस अँड पीने आपल्या अहवालात नमूद केले आहे. आगामी काळात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ही लाट आली तर अर्थव्यवस्थेला आणखी दणका बसू शकतो, असेही अहवालात म्हटले आहे. कोरोनाच्या दुसºया लाटेदरम्यान एप्रिल आणि मे महिन्यात अनेक राज्यात लॉकडाऊन तसेच निर्बंध लागू करावे लागले होते.

कोरोना संकटाचा सलग दोन वर्षे सरकारी तसेच खासगी ताळेबंदाला फटका बसला आहे. याचे दीर्घकालीन परिणाम देखील देशाला भोगावे लागणार असून विकासदरावर त्याचा काही वर्षे परिणाम होईल, असे एस अँड पीने सांगितले आहे. पुढील आर्थिक वर्षात जीडीपी दर ७.८ टक्क्यांवर जाण्याचा अंदाज आहे. सरत्या आर्थिक वर्षात उणे ७.३ टक्के इतका नोंदवला गेला होता. तत्पूर्वीच्या वर्षात म्हणजे २०१९-२० मध्ये कोरोनाचे संकट नसताना देखील हा दर चार टक्क्यांपर्यंत खाली आला होता.

तिसरी लाट येण्याचा कोणताही पुरावा नाही

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या