24.8 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeराष्ट्रीयगहलोत-पायलट संघर्ष सुरुच

गहलोत-पायलट संघर्ष सुरुच

एकमत ऑनलाईन

जयपूर : राजस्­थानमध्­ये मुख्­यमंत्री अशोक गहलोत विरुध्द माजी उपमुख्­यमंत्री सचिन पायलट यांच्­यातील राजकीय संघर्ष सुरुच राहिला आहे. राजस्­थान प्रभारी अजय माकन यांनी लवकरच मंत्रीमंडळ विस्­तार होईल, अशी ग्­वाही सचिन पायलट यांनी दिली होती. त्­यांची नाराजी दूर झाली, असे मानले जात असतानाच गहलोत समर्थक भडकले आहेत. आता अपक्ष आणि बहुजन समाज पार्टीतून काँग्रेसमध्­ये आलेल्­या आमदारांची २३ जून रोजी बैठक बोलविण्­यात आली आहे. काँग्रेस पक्षश्रेष्­ठींवर दबाव टाकण्­यासाठीच ही बैठक घेण्­यात येत असल्­याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

१३ अपक्ष आमदार आणि बसपातून काँग्रेसमध्­ये आलेल्­या सहा आमदारांची बैठक २३ जून रोजी अशोका हॉटेलमध्­ये होणार आहे. सचिन पायलट यांना महत्त्­व दिले जात आहे. यामुळे अस्­वस्­थ झालेला गहलोट गटाने त्­यांच्­याविरोधात रणनीती तयार केली आहे. या बैठकीत मंत्रीमंडळ विस्­तार, सध्­याची राजकीय वातावरण आणि राजकीय नियुक्­त्­यांवर चर्चा होईल. या सर्व आमदारांनी सचिन पायलट यांच्­याविरोधात भूमिका घेतली आहे.

गहलोत गटाकडून पायलटवर दबाव?
सचिन पायलट यांची नाराजी दूर करण्­यासाठी काँग्रेस पक्षश्रेष्­ठींनी त्­यांना महासचिव पदाची ऑफर दिली होती. मात्र मुख्­यमंत्रीपदासाठी आग्रही असणा-या पायलट यांनी ती नाकारली. सध्­या रिक्­त असणा-या सहा मंत्रीपदावर आपल्­याच समर्थक आमदारांची वर्णी लागावी, यासाठी पायलट आग्रही आहेत. तर १३ अपक्ष व बसपातून काँग्रेसमध्­ये प्रवेश केलेल्­या आमदरांचीही याच मंत्रीपदावर नजर आहे. यामुळे आता त्­यांना समोर करुन गहलोत गटाकडून सचिन पायलट यांच्­यावर दबाव आणला जात आहे, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

जिल्‍हा परिषदेतील १६७ अधिकारी, कर्मचा-यांना पदोन्‍नती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या