24.8 C
Latur
Monday, September 27, 2021
Homeराष्ट्रीयसंसदेत सरकारला सहकार्य केले जाणार

संसदेत सरकारला सहकार्य केले जाणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पेगॅससवर चर्चेखेरीज संसद चालू न देण्याच्या भूमिकेवर काँँग्रेसने नरमाईचे संकेत दिले आहेत. ओबीसींच्या यादीमध्ये जातींचा समावेश करण्याचे अधिकार पुन्हा राज्यांना देण्याच्या प्रस्तावित घटनादुरुस्तीसाठी सरकारला संसदेत सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही काँँग्रेसने रविवार दि़ १ ऑगस्ट रोजी दिली. पेगॅससऐवजी अन्य मुद्यावर चर्चा झाली तर पेगॅससचा विषय मागे पडण्याची चिंता काँग्रेसला आहे. काँँग्रेस नेते राहुल गांधींनी विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ही चिंता बोलून दाखविली होती. तसेच, पेगॅससवरील चर्चेखेरीज माघार नाही, असे स्पष्ट केले होते.

मात्र, सरकारने पेगॅसस हा मुद्दाच नसल्याचे म्हणत विरोधकांना अन्य जनहिताच्या विषयांवर बोला, असा खोचक सल्ला दिला आहे. यापार्श्वभूमीवर कॉंग्रेसच्या आज झालेल्या दैनंदिन वार्तालापात प्रवक्ते आणि खासदार अभिषेक मनू सिंघवी यांनी आरक्षणाशी संबंधित संभाव्य घटनादुरुस्तीसाठी सरकारला सहकार्य केले जाईल, असे स्पष्ट केले.

सोबतच सिंघवी यांनी २०१८ मध्ये झालेल्या ३३८ बी घटना दुरुस्तीचा दाखला देत सरकारला लक्ष्य केले. सिंघवी म्हणाले, की या घटनादुरुस्तीच्या वेळी अनेकांनी चिंता व्यक्त केली होती, की राज्यांना ओबीसी यादीमध्ये जातींचा समावेश करण्याचा अधिकार उरणार नाही. हा संघ राज्यव्यवस्थेवर हल्ला असेल. आता पश्चातबुद्धिने सरकार विरोधकांचे सहकार्य मागत आहे. पण आधी चूक झाली त्याचे काय, असा सवाल सिंघवी यांनी केला. सोबतच, ही चूक सुधारण्यासाठी काँंग्रेस तयार असल्याची ग्वाही दिली. संसदेत घटनादुरुस्ती विधेयक आल्यास काँँग्रेस मदत करणार काय, या प्रश्नाला उत्तर देताना सिंघवी म्हणाले, की यावर सरकारला सहकार्य करावेच लागेल. सहकार्य तर २०१८ मध्येच दिले होते. परंतु सरकारने हट्टीपणातून चूक केली.

व्यावसायिक सिलिंडरचे दर वाढले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या