नवी दिल्ली : राज्यात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडत असताना दिल्लीतल्या राजकारणात ही बैठका सुरू आहेत. दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी विरोधकांची हाय व्होल्टेज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला काँग्रेस नेत्यांपासून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यापर्यंत सर्व नेत्यांची उपस्थिती होती. या बैठकीत विविध महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली असून अधिवेशनात सरकारला घेरण्याचा प्लॉन तयार करण्यात आला आहे.
आगामी उपराष्ट्रपती निवडणुकीचे प्लॅनिंग याच बैठकीत ठरणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच उद्यापासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनात केंद्र सरकारला घेरण्याचा प्लॅन याच बैठकीत ठरणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. विरोधकांमधील सर्वात पावरफुल्ल चेहरा म्हणून शरद पवारांकडे पाहिले जाते. त्यामुळेच पवारांसोबत आगामी प्लॅनिंग केले जात आहे.
३२ विधेयके मांडली जाण्याची शक्यता
उद्यापासून सुरू होणा-या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विविध विभागाकडून ३२ विधेयके मांडली जाण्याची शक्यता आहे. आम्ही चर्चे शिवाय विधेयक मंजूर करणार नाही अशी माहिती संसदेच्या पावसाळी अधिवेशनावर केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे. तसेच काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान या बैठकीला उपस्थित नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता, पण मी सांगू इच्छितो की २०१४ पूर्वी पंतप्रधान कधीही सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित नव्हते, मनमोहन सिंग सर्वपक्षीय बैठकीला किती वेळा उपस्थित होते? असा सवाल उपस्थित करत जोशी यांनी जयराम रमेश यांना प्रत्युत्तर दिले आहे.
अग्निपथ योजनेवरून वादाची शक्यता
शरद पवार यांच्या घरी होणा-या या बैठकीला काँग्रेसने ते मल्लिकार्जुन खर्गे, तसेच जयराम रमेश यांनी उपस्थिती लावली होती. तर या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे ही उपस्थित होत्या. शिवसेनेकडून संजय राऊत या बैठकीला उपस्थित राहिले होते, आगामी अधिवेशनात सैन्यदलात भरतीसाठी आणलेली अग्निपथ योजना यावरून विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने येण्याची दाट शक्यता आहे. अग्निपथ योजनेला विरोध करत देशभरात हिंसक आंदोलन झाली आहेत, त्यावरून अधिवेशनात जोरदार राजकीय घामासान होण्याची शक्यता आहे.