22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeराष्ट्रीयतेलंगणात राज्यपाल-मुख्यमंत्री वाद पेटला

तेलंगणात राज्यपाल-मुख्यमंत्री वाद पेटला

एकमत ऑनलाईन

हैदराबाद : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने प्रवासासाठी हेलिकॉप्टर नाकारले होते. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. आता असाच काहीसा वाद तेलंगणातून समोर आला आहे. तेलंगणाच्या के. चंद्रशेखर राव सरकारने महिला असल्यामुळे आपल्याशी भेदभाव केला. तसेच प्रवासासाठी चॉपर दिले नसल्याचा आरोप लावला आहे.

तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदर्यराजन यांनी अनेक प्रसंगांचा संदर्भ देत राज्य सरकारवर त्यांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. महिला असल्यामुळे सरकार भेदभाव करत असल्याचा आरोपही तमिलिसाई यांनी केला आहे. तसेच राज्य सरकारकडून प्रवासासाठी हेलिकॉप्टर न मिळाल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली. प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपालांचे अभिभाषण आणि ध्वजारोहण यापासूनही त्यांना वंचित ठेवण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राज्यपालपदाचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, जेव्हाही मी लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, तेव्हा काही अडथळे आले. महिला राज्यपालांसोबत कसा भेदभाव केला गेला हे तेलंगणाच्या इतिहासात लिहिला जाईल. दरम्यान, राज्यपालांच्या गंभीर आरोपांवर तेलंगणा राष्ट्र समिती आणि केसीआर यांच्याकडून आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, सुंदरराजन या तामिळनाडू भाजपच्या प्रमुख असल्याने या संपूर्ण प्रकरणाकडे राजकीय दृष्टिकोनातूनही पाहिले जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या