24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयआठ राज्यांचे राज्यपाल बदलले

आठ राज्यांचे राज्यपाल बदलले

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवार दि़ ६ जुलै रोजी अनेक राज्यातील राज्यपालांची नियुक्ती केली आहे. थावरचंद गहलोत कर्नाटकचे नवे राज्यपाल असणार आहेत. गेहलोत सध्या केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्री आहेत. अनेकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, तर अनेकांच्या नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

हरिभाऊ कंभमपती हे मिझोरामचे राज्यपाल असतील, मंगुभाई छगनभाई पटेल मध्य प्रदेशचे, राजेंद्र विश्वनाथ अरलेकर यांना हिमाचल प्रदेशचा राज्यपाल करण्यात आले आहे. मिझोरामचे राज्यपाल पीएस श्रीधरण पिल्लाई यांना गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हरियाणाचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्या त्रिपुराचे राज्यपाल असतील. त्रिपुराच्या राज्यपालांना झारखंडची जबाबदारी देण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल बंदारु दत्तात्रय यांना हरियाचे राज्यपाल करण्यात आले आहे. राष्ट्रपती कार्यालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

मंत्रिमंडळातही होणार फेरबदल
राष्ट्रपतींनी राज्यांच्या राज्यपालांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. दोन दिवसांत विशेष म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅबिनेटची बैठक घेणार आहेत. यावेळी अनेक नव्या चेहºयांना संधी मिळण्याची शक्यता आहे. शिवाय अनेकांना डच्चू मिळू शकतो. या पार्श्वभूमीवर राज्यपालांच्या बदल्या किंवा नियुक्त्या झाल्याचे सांगितले जात आहे. कॅबिनेटचा विस्तार झाल्यास, २०१९ नंतर पहिल्यांदा कॅबिनेटमध्ये नव्या मंत्र्यांची भर पडेल. मोदी यांच्या विस्तारित टीममध्ये साधारणत: २० ते २१ नव्या नावांना सामावून घेतले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कॅबिनेटमध्ये काय फेरबदल होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नवीन राज्यपालांची यादी खालीलप्रमाणे
थावरचंद गहलोत, कर्नाटक
हरिभाऊ कंभमपती, मिझोराम
मंगुभाई छगनभाई पटेल, मध्य प्रदेश
राजेंद्र विश्वनाथ अरलेकर , हिमाचल प्रदेश
पीएस श्रीधरण पिल्लाई, गोवा
सत्यदेव नारायण आर्या, त्रिपुरा
बंदारु दत्तात्रय, हरियाणा
रमेश बैस, झारखंड

बलात्काराच्या आरोपीला एन्काऊंटर पॅटर्नचा वापर करावा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या