नवी दिल्ली : आता गुजरातमध्ये आता ड्रॅगन फ्रूट कमलम (कमळ) या नावानं ओळखले जाणार आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी याबाबत घोषणा केली आहे. ड्रॅगन फ्रूट या नावाने प्रसिद्ध असलेले फळ यापुढे गुजरातमध्ये कमलम म्हणून ओळखले जाणार आहे. ड्रॅगन हे फळ कमळासारखे दिसते़ त्यामुळे या फळाला नावं संस्कृत शब्दानुसार कमलम हे देण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी म्हटले आहे.
राज्य सरकारने ड्रॅगन फ्रूटचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. कारण त्याचा बाहेरून आकार हा कमळासारखा आहे. त्यामुळेच आता ड्रॅगन फ्रूटचे नाव हे कमलम असे ठेवण्यात आले आहे. आम्ही चीनशी संबंधित असलेल्या या फळाचे नाव बदलले आहे. कमलम हा एक संस्कृत शब्द आहे आणि या फळाचा आकार देखील कमळासारखाच आहे. त्यामुळे आम्ही कमलम असे नाव ठेवण्याचा निर्णय घेतला, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे़