23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeराष्ट्रीयसत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा एक दिवस लांबली

सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा एक दिवस लांबली

एकमत ऑनलाईन

तिसरे न्यायाधीश अनुपस्थित, प्रकरण घटनापीठाकडे जाणार?
नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षावर सोमवार, दि. २२ ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती. पूर्वनियोजनानुसार ही तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, पुन्हा एकदा ही सुनावणी एक दिवस पुढे ढकलल्याचे सूत्राचे म्हणणे आहे. त्यामुळे यासंदर्भात उद्याऐवजी परवा सुनावणी होऊ शकते. या महिन्यात तिस-यांदा सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. तिसरे न्यायमूर्ती उपस्थित नसल्याने सुनावणी पुढे ढकलल्याचे कारण समोर आले आहे.

शिवसेना कुणाची, याबाबत शिंदे गट व शिवसेनेने दाखल केलेल्या विविध याचिकांवर सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी होणार होती. यापूर्वीच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण घटनापीठाकडे सोपविण्याबाबत सूतोवाच केले होते. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र, तारीख पे तारीख येत असल्याने सुनावणी सातत्याने लांबणीवर पडत आहे. २२ ऑगस्टची सर्वांना प्रतीक्षा होती. मात्र, ऐनवेळी तिसरे न्यायाधीश नसल्याचे कारण पुढे करून आणखी एक दिवस सुनावणी लांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शिवसेनेच्या दाव्याबाबत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाने निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत विधिमंडळाने बंडखोर तसेच शिवसेनेच्या आमदारांवर कोणतीही कारवाई करू नये, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. तसेच धनुष्यबाण या शिवसेनेच्या चिन्हावरही शिंदे गटाने दावा केला आहे. त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण होईपर्यंत याबाबत काही निर्णय देऊ नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे या दृष्टीनेदेखील ही सुनावणी महत्त्वाची आहे.

याआधी निवडणूक आयोगात सुनावणी होणार होती. त्यामुळे त्याआधी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची मागणी उद्धव ठाकरे यांच्या गोटातून केली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने सांगितले की, ठरलेल्या वेळेतच सुनावणी होणार आहे, तर केंद्रीय निवडणूक आयोगाने २ आठवड्यात कागदपत्रे सादर करण्याचे आदेश शिवसेनेला दिले आहेत. २३ ऑगस्टपर्यंत कागदपत्रे सादर करण्याचे आयोगाचे आदेश कायम आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग काय निर्णय देतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सुप्रीम कोर्टात निर्णय होईल असे वाटत नाही
सर्वोच्च न्यायालयात सरकारचा निर्णय होईल, असे वाटत नाही, असे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांनी म्हटले आहे. कारण अद्याप घटनापीठ स्थापन झाले नाही. घटनापीठाची स्थापना होईल की नाही, हे बघावे लागेल. त्यानंतर घटनापीठात किती न्यायाधिशांचे असतील. त्यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत. तसेच घटनापीठापुढे कोणते मुद्दे उपस्थित केले जाणार, हे त्यांना स्पष्ट करावे लागेल. त्यानंतरच युक्तिवाद सुरू होईल, असेही ते म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या