34.3 C
Latur
Tuesday, April 13, 2021
Homeऔरंगाबादअजिंठा लेण्यांचा वारसा डिजिटल होणार

अजिंठा लेण्यांचा वारसा डिजिटल होणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी ११ वाजता मन की बात रेडिओ कार्यक्रमाद्वारे संवाद साधत असतात. आज २९ नोव्हेंबर रोजी त्यांनी मन की बात कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला. त्यांनी मन की बातच्या सुरुवातीलाच एक आनंदाची बातमी शेअर केली. आपली एक अतिशय प्राचीन काळातली देवी अन्नपूर्णा मातेची मूर्ती कॅनडावरून परत भारतात येतेय. ही मूर्ती जवळपास १०० वर्षांपूर्वी वाराणसीच्या एका मंदिरातून चोरून बाहेर पाठवली होती, अशी माहिती पंतप्रधान मोदींनी दिली.

मोदी म्हणाले की, अंजिठ्याच्या लेण्यांचा वारसाही डिजिटल करण्यात येत आहे. यामध्ये अजिंठा लेण्यांची संपूर्ण झलक पाहायला मिळेल. यामध्ये डिजिटलाइज्ड आणि पुन्हा स्थापन केलेल्या कलाकृती यांच्या बरोबरच यासंबंधित दस्तऐवज आाणि अनेकांनी व्यक्त केलेल्या शब्दभावना, यांचाही समावेश असेल, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, दिनांक १२ नोव्हेंबरपासून डॉक्टर सलीम अलीजी यांच्या १२५ व्या जयंतीच्या कार्यक्रमाला प्रारंभ झाला आहे. डॉक्टर सलीम अली यांनी पक्ष्यांच्या दुनियेमध्ये, पक्षी निरीक्षणासंबंधी अतिशय उल्लेखनीय कार्य केले आहे.

नागालँडमध्ये सापडले हि-यांचे भांडार?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या