27.8 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeराष्ट्रीयसहारा समूहाला सर्वोच्च दणका

सहारा समूहाला सर्वोच्च दणका

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने सहारा समूहाला मोठा दणका दिला आहे. समूहाशी संबंधित नऊ कंपन्यांविरुद्ध एसएफआयओच्या चौकशीला स्थगिती देण्याचा दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज रद्द केला.

न्यायमूर्ती डी. वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध एसएफआयओने दाखल केलेल्या अपीलला परवानगी दिली. न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता समूह कंपन्यांविरोधात चौकशीचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकरणाच्या तपासाला स्थगिती देण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आले.

एसएफआयओने सहारा समूहाच्या प्रमुखाविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयाच्या १३ डिसेंबर २०२१ च्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होते, त्यानंतरच्या सर्व कार्यवाहीला त्यांनी स्थगिती दिली होती. यात दंडात्मक कारवाई आणि लूकआउट नोटिसांचा समावेश आहे. सहारा समूहाच्या कंपन्यांना दिलासा देण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणा-या

एसएफआयओच्या याचिकेवर १७ मे रोजी विचार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहे. विशेष म्हणजे, सहारा समूहाशी निगडीत नऊ कंपन्यांच्या चौकशीसाठी एसएफआयओच्या दोन आदेशांच्या अंमलबजावणीलाही हायकोर्टाने स्थगिती दिली होती.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या