31 C
Latur
Thursday, January 21, 2021
Home क्राइम गतवर्षी महिलांवरील घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणात सर्वाधिक वाढ

गतवर्षी महिलांवरील घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणात सर्वाधिक वाढ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: गेल्यावर्षी म्हणजे २०२० साली कोरोनाने कहर माजवला होता. मात्र त्याचबरोबर लहान मुले व महिलांवरील घरगुती हिंसाचाराच्या घटनांतही कमालीची वाढ झाल्याचे मत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालात मांडण्यात आले आहे. हे प्रमाण गेल्या ६ वर्षातील सर्वाधिक आहे.यापुर्वी २०१४ मध्ये हे प्रमाण सर्वाधिक नोंदले गेले होते.

राष्ट्रीय महिला आयोगाकडे गेल्यावर्षी २०२० मध्ये महिलांवरील अत्याचाराच्या २३,७२२ तक्रारी दाखल झाल्या. त्यातील तब्बल एक चतुर्थांश तक्रारी या महिलांवरील घरगुती हिंसाचाराच्या आहेत. महिला आयोगाकडे दाखल तक्रारींमध्ये सर्वाधिक प्रमाण उत्तरप्रदेशमध्ये ११,८७२ इतके आहे. तर दिल्लीत २,६३५, हरियाणा १,२६६ व महाराष्ट्रात १,१८८ तक्रारी दाखल झाल्या आहेत. २३,७२२ तक्रारींपैकी ५,२९४ तक्रारी या घरगुती हिंसाचाराच्या प्रकारातील आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या तक्रारी यापुर्वी २०१४ मध्ये यापेक्षा जास्त म्हणजे ३३,९०६ इतक्या नोंदल्या गेल्याचे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी सांगितले आहे.

आर्थिक असुरक्षितता,वाढता तणाव कारणीभूत
आर्थिक असुरक्षा, वाढता तणाव,भवितव्याची चिंता व संकटाच्यावेळी परिवार व नातलगांकडून न मिळणारे भावनिक सहकार्य आदी कारणांमुळे महिलांवरील घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणात वाढ झाली आहे. यंदा कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनचा सर्वात जास्त त्रास महिलांना झाला. वर्क फ्रॉम होममुळे घरातच कार्यालयीन कामामुळे येणारा तणाव, मुलांची शाळा व महाविद्यालयीन शिक्षणही ऑनलाईन चालल्यामुळे त्याचेही व्यवस्थापनाचे ओझे घरातील महिलांवरच वाढले होते. परिणामी चिडचिड,मानसिक तणावातून उद्भवलेल्या वादातून महिलांवरील घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे आढळून आल्याचे रेखा शर्मा यांनी सांगितले.

लॉकडाऊन काळात १३ हजार घटना
महिलांवरील घरगुती अत्याचाराच्या वर्षभरात २३ हजार ७२२ तक्रारी आल्या असल्यातरी त्यातील १३ हजार ४१० तक्रारी केवळ लॉकडाऊनच्या ४ महिन्यातच आल्या आहेत. उर्वरीत ८ महिन्यात १० हजार तक्रारी आल्या म्हणजे लॉकडाऊनच्या ४ महिन्यातच जवळपास निम्म्या तक्रारी आल्या आहेत.

 

शेकडो कावळ्यांचा बर्ड फ्ल्यूने मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,414FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या