23.8 C
Latur
Tuesday, March 2, 2021
Home राष्ट्रीय अन्नपूर्णेची मूर्ती लवकरच भारतात

अन्नपूर्णेची मूर्ती लवकरच भारतात

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : वाराणसीतील मंदिरातून १०० वर्षांपूर्वी चोरण्यात आलेली आणि कॅनडातील एका विद्यापीठाच्या कला दालनात ठेवलेली अन्नपूर्णा या हिंदू देवतेची मूर्ती कॅनडातील संबंधित विद्यापीठ लवकरच भारताकडे सुपूर्द करणार आहे.

मॅकेन्झी कलादालनात रेजिना विद्यापीठाचा वस्तुसंग्रह असून तेथे सध्या ही मूर्ती ठेवली आहे. जवळपास १०० वर्षांपूर्वी ही मूर्ती चुकीने नेण्यात आल्याचे मॅकेन्झीच्या संग्रहालयाची पाहणी करीत असताना दिव्या मेहरा या कलाकाराच्या निदर्शनास आले, असे विद्यापीठाने एका निवेदनात म्हटले आहे.

अन्नपूर्णा देवीची ही मूर्ती आभासी पद्धतीने भारतात पाठविण्याचा समारंभ १९ नोव्हेंबर रोजी पार पडला. मात्र आता ही मूर्ती लवकरच भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. ही मूर्ती अधिकृतपणे भारतात पाठविण्यासाठी विद्यापीठाचे अंतरिम अध्यक्ष आणि कुलगरू डॉ. थॉमस चेस यांनी कॅनडातील भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांच्याशी दूरचित्रसंवाद साधला.

इलेक्ट्रिक शॉक लागून टिप्पर ड्रायव्हरचा मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या