21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeराष्ट्रीयधार्मिक वादाचा परिणाम भारताबाहेरही होत आहे

धार्मिक वादाचा परिणाम भारताबाहेरही होत आहे

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानापासून देशात अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या. शर्मा यांच्या विधानाचे पडसाद भारताबाहेर देखील उमटले होते. तर भारतात या मुद्दावरून आतापर्यंत तीन हत्या झाल्याचा दावा करण्यात येत आहे. देशातील वाढत्या धर्मिक हिंसेवर आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी मोठे विधान केले आहे. ते दिल्लीत बोलत होते.

डोभाल म्हणाले की, काही घटक भारताच्या प्रगतीला बाधा आणणारे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते धर्म आणि विचारसरणीच्या नावाखाली तेढ आणि संघर्ष निर्माण करत आहेत. याचा संपूर्ण देशावर आणि देशाबाहेरही विपरीत परिणाम होत, असल्याचेही डोभाल यांनी म्हटले. एआयएसएससी सईद चिश्ती यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी सईद चिश्ती म्हणाले की, जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा आम्ही निषेध करतो. काहीतरी करण्याची हीच वेळ आहे. कट्टरपंथी संघटनांना लगाम घालणे आणि त्यावर बंदी घालणे ही काळाची गरज आहे. कोणत्याही कट्टरपंथी संघटना असोत, त्यांच्याविरुद्ध पुरावे असल्यास त्यांच्यावर बंदी घातली पाहिजे सय्यद चिश्ती यांनी म्हटले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या