23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeराष्ट्रीयतडाखा बसलेल्या जिल्ह्यांना तिस-या लाटेचा धोका कमी

तडाखा बसलेल्या जिल्ह्यांना तिस-या लाटेचा धोका कमी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दुस-या लाटेत देशातील अनेक जिल्ह्यांचे प्रचंड नुकसान झाले़ मात्र अशा जिल्ह्यांसाठी रविवार दि़ १ ऑगस्ट रोजी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर)ने दिलासादायक बाब समोर आणली असून, आयसीएमआरच्या अहवालानुसार दुस-या लाटेतील तडाखा बसलेल्या जिल्ह्यांना संभाव्य तिस-या लाटेचा धोका अत्यल्प राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे़

देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला देशात दररोज ४ लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद व्हायची. आता हाच आकडा ५० हजारांच्या खाली आला आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने अनेक राज्यांनी निर्बंध शिथिल केले. त्यामुळे काही भागांत पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला. त्यामुळे तिस-या लाटेचा धोका वाढला आहे. तिस-या लाटेची भीती असताना भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) महत्त्वाची माहिती दिली आहे.

कोरोनाच्या दुस-या लाटेचा सर्वाधिक तडाखा बसलेल्या जिल्ह्यांमध्ये तिस-या लाटेची तीव्रता फारशी असणार नाही, असे आयसीएमआरने सांगितले आहे. त्यामुळे दुस-या लाटेचा मोठा तडाखा अनुभवलेल्या जिल्ह्यांना तिस-या लाटेत दिलासा मिळेल. या जिल्ह्यांमध्ये तिसरी लाट दुस-या लाटेइतकी घातक नसेल, असा आयसीएमआरचा अभ्यास सांगतो.

जिल्हा स्तरावर नियोजन करा
तिस-या लाटेचा धोका लक्षात घेऊन जिल्हा स्तरावर नियोजन करा आणि स्थानिक आकडेवारी विचारात घेऊन पावले उचला, अशा सूचना आयसीएमआरने राज्यांना दिल्या आहेत. महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये जिल्ह्यानुसार परिस्थिती बदलते. त्यामुळे जिल्हा पातळीवर नियोजन अतिशय महत्त्वाचे असल्याचे आयसीएमआरच्या महामारी आणि संसर्गजन्य आजार विभागाचे प्रमुख आणि वरिष्ठ महामारीतज्ज्ञ समीरन पांडा यांनी सांगितले.

अतिसंवेदनशील जिल्ह्यांचे लसीकरण गरजेचे
संपूर्ण राज्यात तिसरी लाट असे ढोबळपणे म्हणणे अयोग्य ठरेल. कारण सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या तिस-या लाटेचा परिणाम एकसारखाच असणार नाही. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात राखण्यासाठी जिल्हा स्तरावर नियोजन गरजेचे आहे. याबद्दलचे व्यवस्थापन करण्यासाठी योजना आखायला हवी, असे पांडा म्हणाले. दुस-या लाटेत ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रकोप अधिक नव्हता, त्या जिल्ह्यांमध्ये तिस-या लाटेत अधिक लोक अतिसंवेदनशील असतील. त्या व्यक्तींच्या समूहाचे लसीकरण लवकर करायला हवे, असे पांडांनी म्हटले आहे.

 

आता दगडफेक करणा-यांवर कठोर कारवाई

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या