27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeराष्ट्रीयभारतीय हवाई दल अधिक सक्षम होणार

भारतीय हवाई दल अधिक सक्षम होणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने मेक इंडिया अंतर्गत टाटा समुहासोबत एक मोठा करार केला आहे. हवाई दलासाठी नवीन विमानं तयार करण्याच्या या करारावर शुक्रवारी स्वाक्षरी करण्यात आली आहे. एकूण २०,००० करोड रुपयांचा सी-२९५ विमान तयार करण्याचा करार हवाई दलाच्या इतिहासातील एक मोठा करार आहे. टाटा कंपनी ही हवाई दलाचे विमाने तयार करणारी पहिली खासगी कंपनी असणार आहे. सुरुवातील हैदराबाद किंवा बंगळुरुमध्ये ही विमाने तयार करण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात होते. मात्र आता उत्तर प्रदेशमध्ये आणि गुजरातमध्ये हा प्रकल्प सुरु होणार असल्याचे समजत आहे.

टाटा समूह एअर बस डिफेन्स एँड स्पेस या स्पेनच्या कंपनीसोबत मिळून हवाई दलाच्या सी-२९५ विमानांची निर्मीती करणार आहे. सी-२९५ हे विमान हवाई दलाच्या सैनिकांच्या वाहतुकीसाठी वापरली जातात. केंद्र सरकारने या प्रकल्पाचा करार टाटा समुहाला दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा करार प्रलंबित होता. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार हा २०,००० करोड रुपयांचा करार असणार आहे.

स्वाक्षरी प्रक्रिया पूर्ण
संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते ए भारतभूषण बाबू यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे. भारताचे संरक्षण मंत्रालय आणि एअरबस डिफेन्स एँड स्पेस या स्पेन स्थित कंपनीला ५६ सी-२९५ ही विमाने तयार करण्याच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आल्याची माहिती, ए भारतभूषण बाबू यांनी यावेळी दिली आहे. यातील १६ विमाने ४८ महिन्यांच्या आत स्पेनमधून उड्डाणासाठी तयार स्थितीत दिली जातील, तर १० वर्षांच्या आत टाटा कन्सोर्टियमद्वारे ४० विमाने भारतात तयार केली जातील.

सी -२९५ विमानांसाठी करार
हवाई दलाकडे १९६० च्या दशकातील ५ एव्हो ट्रान्स्पोर्ट विमाने आहेत, जी सध्या तात्काळ बदलण्याची गरज आहे. मे २०१३ मध्ये जागतिक कंपन्यांना रिक्वेस्ट फॉर प्रपोजल (आरएफपी) देण्यात आला होता. त्यानंतर सी -२९५ विमानांच्या निर्मीतीसाठी एअरबस आणि टाटा समूहासोबत संरक्षण मंत्रालयाने करार केला आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या