35 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeआंतरराष्ट्रीयटाईमच्या पहिल्याच किड ऑफ इअर ची मानकरी ठरली भारतीय मुलगी

टाईमच्या पहिल्याच किड ऑफ इअर ची मानकरी ठरली भारतीय मुलगी

जगप्रसिध्द अभिनेत्री अँजेलिना जोलीने घेतली मुलाखत; सुमारे ५ हजार मुलांमधून झाली निवड

एकमत ऑनलाईन

न्यूयॉर्क : टाईम मासिकाने पहिल्यांदाच लहान मुलांसाठीच्या पुरस्काराची घोषणा केली असून, टाइमच्या ‘किड ऑफ द इयर’चा पहिलाच पुरस्कार भारतीय वंशाच्या मुलीला मिळाला आहे. भारतीय वंशाची अमेरिकेतील नागरीक गीतांजली रावला हा पुरस्कार मिळाला आहे. उदयोन्मुख वैज्ञानिक आणि संशोधक म्हणून ओळखल्या जाणा-या पंधरा वर्षीय गीतांजलीची निवड विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणा-या सुमारे ५ हजार मुलांमधून करण्यात आली आहे़

गीतांजलीने सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी नवे अ‍ॅप तयार केले असून, यामुळे जगात होणा-या अनेक सायबर गुन्ह्यांना आळा बसणार आहे़ निरीक्षण करणे, त्यावर विचार करणे, त्यानंतर संशोधन आणि संवाद साधणे या मार्गाचा अवलंब संशोधनात करत असल्याचे गीतांजलीने आपल्या मुलाखतीत म्हटले.
वयाच्या १० वर्षी बनविले कार्बन नॅनोट्यूट सेंसर गीतांजलीने सांगितले की, ती १० वर्षांची असताना तिने कार्बन नॅनोट्यूट सेंसर टेक्नोलॉजीवर संशोधन करण्याबाबत विचार केला होता. आयुष्यातील बदलाला तिथूनच सुरुवात झाली असल्याचे सांगितले. यावर कोणी काम करत नाही. त्यामुळे हे काम मला करण्याची इच्छा असल्याचे तिने म्हटले.

सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी बनविले अ‍ॅप
सायबर बुलिंगच्या त्रासापासून वाचण्यासाठी एका अ‍ॅपची निर्मिती गीतांजलीने केली होती. सध्या पाण्याची शुद्धता तपासण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी तिचे संशोधन सुरू आहे. ऑस्कर पुरस्कार विजेती आणि हॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री अँजेलिना जोलीने व्हिडिओ कॉन्फरन्सवर तिची मुलाखत घेतली.

– सायबर गुंडगिरी रोखण्यासाठी केलेल्या शोधाबद्दल बोलताना गीतांजलीने सांगितले की, काईंडली हे अ‍ॅप असून क्रोम एक्सटेंशनदेखील आहे. याद्वारे सायबर गुंडगिरीला आळा घालता येऊ शकतो.

– या अ‍ॅपसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजेंस) तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते. फक्त जगाची समस्या सोडवावी यापुरते संशोधन मर्यादित नसून इतरांनीही अशाप्रकारचे संशोधन करावे, यासाठी त्यांना प्रेरीत करण्याचा प्रयत्न करत आहे.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या