30.2 C
Latur
Wednesday, March 3, 2021
Home राष्ट्रीय घुसखोर हीच काँग्रेसची व्होटबँक

घुसखोर हीच काँग्रेसची व्होटबँक

एकमत ऑनलाईन

दिसपूर : काँग्रेस आणि ऑल इंडिया डेमोक्रेटिक फंडचे संस्थापक बदरुद्दीन अजमल हे घुसखोरांसाठी सारे दरवाजे उघडतील. कारण तीच त्यांची व्होटबँक आहे. काँग्रेसची रणनिती ही इंग्रजांसारखी फोडा आणि राज्य करा, अशी आहे, असा घणाघात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. आसामच्या नालबारी येथे विजय संकल्प कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेवरही निशाणा साधला. घुसखोरांना फक्त भाजप सरकार रोखू शकते, असा दावाही केला.
जे कित्येक वर्षांपासून इथे सरकारमध्ये आहेत त्यांनी आसामच्या संस्कृतीसाठी काय केले? असा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे. मते गोळा करण्याव्यतिरिक्त या लोकांनी आणखी काही केलेले नाही.असेही शाह म्हणाले.

काँग्रेस अनेकदा भाजपवर सांप्रदायिकतेचा आरोप करते. मात्र, तीच काँग्रेस केरळमध्ये मुस्लीम लीगसोबत आहे तर आसाममध्ये बदरुद्दीन अजमलसोबत युती केली आहे. काँग्रेस आसामला कोणत्या दिशेला घेऊन जात आहे?, असा सवालही त्यांनी केला. कलम ३७० ला कुणीही हात लावू शकत नव्हते. मात्र, आम्ही त्याबाबतचा निर्णय करुन दाखवला. प्रभू श्रीरामांचे मंदिर बनवण्याबाबत देशभरातून आवाज उठत होता. काँग्रेस इंग्रजांच्या नितीवर चालत राहिली. लोकांमध्ये फूट पाडा आणि राज्य करा, अशी त्यांची रणनिती आहे. आसाममध्ये इतके दिवस त्यांनी तेच केले. काँग्रेसने लोकांना आपसात लढवत आसामला रक्तरंजित केले. यामध्ये १० हजारपेक्षा जास्त युवकांचे रक्त सांडले आहे, असे शाह यांनी सांगितले.

 

उद्यापासून होणार डिजिटल मतदान ओळखपत्र जारी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या