23 C
Latur
Friday, August 12, 2022
Homeराष्ट्रीयन्यायव्यवस्था राज्यघटनेला उत्तरदायी : रमण

न्यायव्यवस्था राज्यघटनेला उत्तरदायी : रमण

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सध्या भारतामध्ये सत्तेत असलेल्या पक्षाला स्वत:च्या प्रत्येक कृत्याचे न्यायव्यवस्थेने समर्थन करावे असे वाटते तर विरोधकांना स्वत:चे स्थान बळकट करण्यासाठी न्यायव्यवस्थेने त्यांच्यासाठी पूरक भूमिका घ्यावी त्यांना पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा असते, पण न्यायव्यवस्था ही केवळ आणि केवळ राज्यघटनेला उत्तरदायी असल्याचे प्रतिपादन सरन्यायाधीश एन.व्ही. रमण यांनी केले.

आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाली असताना राज्यघटनेनी प्रत्येक संस्थेची निश्चित केलेली भूमिका आणि त्यांच्या जबाबदा-या लोकांना समजून घेता आलेल्या नाहीत अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को येथे ‘असोसिएशन ऑफ इंडियन अमेरिकन’ या संघटनेकडून आयोजित गौरव समारंभात ते बोलत होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या