22.2 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयभाजप आमदारांच्या गैरहजेरीत केजरीवाल सरकारने सिध्द केले बहुमत

भाजप आमदारांच्या गैरहजेरीत केजरीवाल सरकारने सिध्द केले बहुमत

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आणलेला विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्यात आला आहे. भाजप आमदारांच्या गैरहजेरीत ५८ आप आमदारांनी केजरीवालांच्या समर्थनार्थ मतदान केले, तर विरोधात एकही मत पडले नाही.

दिल्ली विधानसभेत आपने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. मतांच्या विभाजनातून प्रस्ताव पार पडला. आमदारांना उभे करून मतमोजणी करण्यात आली. यावेळी ५९ आमदार उपस्थित होते. विरोधक सभागृहात उपस्थित नसल्याने त्यांच्या बाजूने शून्य मते पडली. आपच्या तीन आमदारांपैकी एक आमदार सत्येंद्र जैन तुरुंगात आहेत. विधानसभेचे आणखी एक आमदार राम निवास गोयल हे परदेश दौ-यावर आहेत, तर नरेश बाल्यान ऑस्ट्रेलियाला गेले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या