22.1 C
Latur
Friday, August 12, 2022
Homeराष्ट्रीयमजुराच्या मुलाला मिळाली अडीच कोटींची शिष्यवृत्ती

मजुराच्या मुलाला मिळाली अडीच कोटींची शिष्यवृत्ती

एकमत ऑनलाईन

पाटणा : बिहारमधील रोजंदारी मजुराच्या १७ वर्षांच्या मुलाला अमेरिकेत पदवीसाठी २.५ कोटी रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे. ही शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी त्याने परीक्षा दिली होती, ज्यामध्ये त्याने संपूर्ण जगात सहावा क्रमांक पटकावला आहे. आता रोजंदारी मजुराचा मुलगा अमेरिकेत शिकणार आहे. प्रेम असे या मुलाचे नाव आहे.

मेकॅनिकल इंजिनीअरिंग करण्यासाठी अमेरिकेतील लाफायेटे कॉलेजमधून त्याला अडीच कोटी रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे. बिहारची राजधानी पाटणाच्या शेजारी असलेल्या गोनपूर येथील रहिवासी प्रेम कुमार याला लाफायेटे कॉलेजने ही शिष्यवृत्ती दिली. या शिष्यवृत्तीसाठी भारतातून ६ नावे पाठवण्यात आली होती.

फुलवारी शरीफ येथील गोनपूर दलित वस्तीतील झोपडपट्टीत राहणा-या प्रेम कुमार याला त्याच्या अभ्यासाच्या जोरावर ही अडीच कोटींची शिष्यवृत्ती मिळालीे. प्रेम हा झोपडपट्टीतील एका अंधा-या खोलीत दिवे लावून अभ्यास करायचा. आता तो अमेरिकेतील एका मोठ्या कॉलेजमध्ये शिकणार आहे. प्रेमचे वडील रोजंदारी मजूर असून १२ वर्षांपूर्वी त्याच्या आईचे निधन झाले. रोजंदारीवर काम करूनही वडिलांनी मुलाला शिकवले.

संघर्ष नसता तर, यश मिळाले नसते!
आज अडीच कोटींची शिष्यवृत्ती मिळवणारा प्रेम हा भारतातील एकमेव तरुण ठरला आहे. प्रेम कुमार याने सांगितले की, आम्ही खूप संघर्ष केला आहे, संघर्ष नसता तर हे यश मिळू शकले नसते, माझ्या अभ्यासादरम्यान मला ज्या काही संधी मिळाल्या त्यामध्ये मी सहभागी झालो आणि माझे ध्येय गाठले, आम्ही अत्यंत गरीब कुटुंबातून आलो आहोत. माझे वडील शेतमजूर म्हणून काम करतात.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या