नवी दिल्ली : येथील प्रगती मैदानावर भारतातील सर्वात मोठ्या ड्रोन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. ड्रोनच्या माध्यमातून किटकनाशकांचा शिडकावा कसा करायचा, याचे प्रात्यक्षिक या महोत्सवात दाखवण्यात येणार आहे. हा महोत्सव २७ आणि २८ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात ७० हून अधिक प्रदर्शक ड्रोनच्या विविध वापराचे प्रकार दाखवणार आहेत.