27.3 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeराष्ट्रीय50 पैशांनी 200 नाणी जमवून वकिलाने 100 रुपयांचा दंड भरला

50 पैशांनी 200 नाणी जमवून वकिलाने 100 रुपयांचा दंड भरला

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे वकील रीपक कंसल यांनी न्यायालयातील रजिस्ट्रीवर काही खटल्यांच्या यादीमध्ये भेदभाव करत त्यांना अयोग्य प्राधान्यक्रम देत असल्याचा आरोप केला होता. न्यायमूर्ती अरुण मिश्रा, न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर आणि न्यायमूर्ती एम. आर. शहा यांच्या खंडपीठाने रीपक कंसल यांच्या याचिकेतील आरोप फेटाळून लावत रजिस्ट्रीवर तथ्यहीन आरोप केल्याप्रकरणी त्यांना 100 रुपये नाममात्र दंड ठोठावला होता. कंसल यांनी दंडाची ही रक्कम 50 पैशांची 200 नाणी एकत्र करून भरली आहेत.

दंडाची ही रक्कम भरण्यासाठी कंसल काही महिन्यांपासून 50 पैशांची नाणी जमा करत होते. 100 रुपयांचा दंड भरण्यासाठी त्यांना 200 नाण्यांची गरज होती. त्यांना ही नाणी जमा करण्यासाठी त्यांच्या सहकाऱ्यांनीही मदत केली. 50 पैशांची 200 नाणी जमा झाल्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये जमा करण्यात आली आहेत. दंडाची रक्कम अशा प्रकारे भरून प्रतिकात्मक निषेध नोंदवण्यात येत असल्याचे रीपक यांना पाठिंबा देणाऱ्या वकिलांनी सांगितले. सध्या 50 पैशांची नाणी सहजतेने मिळत नसल्याने वकिलांनी व्हॉटस्अॅपवर ‘Contribute Rs 100’ नावाचा ग्रुपही बनवला होता. त्यात 125 वकील सहभागी झाले होते आणि त्यांनी रीपक यांनी पांठिबा दिला होता. अखेर 50 पैशांची 200 नाणी जमा झाल्यावर दंड भरण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे वकील रीपक कंसल यांनी न्यायालयातील रजिस्ट्रीवर काही खटल्यांच्या यादीमध्ये भेदभाव आणि अयोग्य प्राधान्यक्रम देत असल्याचा आरोप केला होता. कंसल यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती की, सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीकडून नियमितपणे काही लॉ फर्म, काही वकील आणि त्यांच्या खटल्यांना व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते. हा प्रकार म्हणजे सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळण्याच्या समान संधीच्या विरोधात आहे. सुनावणीसाठी खटले सूचीबद्ध करताना ‘पिक अँड सिलेक्ट’ धोरण अवलंबू नये आणि कोर्टाच्या रजिस्ट्रीला निःपक्षपातीपणा आणि समान वागणूक द्यावी, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली होती.

या प्रकरणी रीपक कंसल यांनी रजिस्ट्रीवर केलेले आरोप फेटाळून लावण्यात आले. तसेच रजिस्ट्रीतील सदस्य आपले काम सुरळीत होण्यासाठी मेहनत घेत असतात. अशाप्रकारचे आरोप करून त्यांच्या कामाची उमेद कमी करण्याचे प्रयत्न करू नये, असेही न्यायालयाने म्हटले होते आर्णि कसंल यांना नाममात्र दंड ठोठावला होता. मात्र, हा दंड अयोग्य असल्याचे सांगत वकील रीपक कंसल यांना अनेक वकिलांनी पाठिंबा दर्शवला होता. तसेच 50 पैशांची तब्बल 200 नाणी रजिस्ट्रीकडे जमा करत त्यांनी प्रतिकात्मक निषेध नोंदवला आहे.

मुलींच्या लग्नाचे किमान वय बदलण्याची शक्यता, मोदींचे संकेत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या