नवी दिल्ली : स्वदेशी बनावटीच्या ‘तेजस’ फायटर विमानामधून लवकरच ‘अस्त्र’ क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात येणार आहे. ‘अस्त्र’ हे हवेतील लक्ष््याचा वेध घेणारे स्वदेशी क्षेपणास्त्र आहे. ‘अस्त्र’ हे नजरेपलीकडील लक्ष्याच्या (बी.व्ही.आर) वेध घेणारे हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. ‘अस्त्र’ने सुसज्ज तेजस विमानाला शत्रुच्या फायटर विमानावर लांबूनही हल्ला करता येईल.
ध्वनिच्या वेगापेक्षा साडेचार पट अधिक गतीने (मॅक-४.५) या क्षेपणास्त्राचा वेग आहे. तेजसमधून ‘अस्त्र’ची चाचणी करण्याआधी काही चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. पुढच्या काही महिन्यात तेजसमधून अस्त्रच्या चाचण्या सुरु होतील असे सूत्रांनी सांगितले.
परदेशी महाग मिसाईलची गरज संपणार
सर्व प्रकारच्या वातावरणात दिवसा-रात्री लक्ष्याचा अचूकतेने वेध घेण्यास अस्त्र सक्षम आहे. सध्या या क्षेपणास्त्राची रेंज १०० किमी आहे. अस्त्रची चाचणी यशस्वी ठरली तर रशिया, फ्रान्स आणि इस्रायलकडून महागड्या ‘बीव्हीआर’ मिसाइलच्या खरेदीची गरज पडणार नाही.
अस्त्र क्षेपणास्त्राचेही आधुनिकीकरण सुरु
‘अस्त्र’च्या मार्क २ आवृत्तीची चाचणी करण्याची डीआरडीओची योजना आहे. पुढच्यावर्षी १६० किमी रेंजच्या अस्त्रच्या नव्या आवृत्तीची चाचणी होईल. सुखोई-३० फायटर विमानामध्ये ‘अस्त्र’ची चाचणी यशस्वी ठरली होती.
२८ अन्न प्रक्रिया प्रकल्पांना मंजुरी