22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeराष्ट्रीय२,५०० गावक-यांचे प्राण वाचवून २ वैमानिक शहीद

२,५०० गावक-यांचे प्राण वाचवून २ वैमानिक शहीद

एकमत ऑनलाईन

मुंबई : गुरुवारी रात्री उशिरा राजस्थानमधील बारमेरच्या भीमडा गावात भारतीय हवाई दलाचे मिग-२१ लढाऊ विमान कोसळले. या अपघातात फायटर जेटचे दोन वैमानिक शहीद झाले. मिग विमान पडताच त्याला आग लागली आणि ते सर्व बाजूंनी पेटले.

स्फोट इतका जोरदार होता की त्याचा आवाज आसपासच्या ८-१० किमीच्या परिसरात ऐकू गेला. अर्धा किलोमीटरपर्यंत पसरलेल्या ढिगा-यात सगळीकडे आग पसरली होती.

अशा परिस्थितीत हे अपघातग्रस्त विमान गावावर पडले असते तर २५०० जीव धोक्यात आले असते. मात्र हवाई दलातील दोन्ही वैमानिकांनी जीवाची पर्वा न करता या अडीच हजार लोकांचे प्राण वाचवले.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मिग-२१ विमानाला हवेत असताना आग लागली. अशा परिस्थितीत लोकवस्तीच्या गावावर विमान कोसळू नये, म्हणून विंग कमांडर मोहित राणा आणि फ्लाइट लेफ्टनंट अद्वितीय बल या दोन्ही वैमानिकांनी ते वालुकामय किना-याच्या दिशेने नेले, जेणेकरून २५०० लोकसंख्या असलेल्या गावाला वाचवता येईल. अपघाताच्या वेळी विमानात उपस्थित असलेल्या दोन्ही पायलटचे पॅराशूट उघडले नव्हते. तथापि, दोन्ही वैमानिकांनी जीवाची बाजी लावून सुमारे २५०० लोकांचे प्राण वाचवले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या