22.2 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयमुख्य आघाडी स्थापन होणार

मुख्य आघाडी स्थापन होणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सध्या देशाच्या राजकारणात अनेक घडामोडींनी वेग घेतला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी तिसरी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा होती. सध्या ते चार दिवसीय दिल्ली दौ-यावर आहेत. मात्र आता त्यांनी तिर्स­या आघाडीची शक्यता फेटाळून लावली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या दौ-यादरम्यान पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे.

आता तिसरी आघाडी नाही तर मुख्य आघाडी बनेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, आम्ही निर्णय घेतला आणि बिहारचे पक्ष एकत्र आले. ज्या राज्यांमध्ये विरोधी पक्ष आहेत, तिथे त्यांची बैठक झाल्यास देशात वातावरण निर्माण होण्यास सुरु होईल आणि हे २०२४ साठी चांगले ठरणार आहे. पुढे ते म्हणाले, मागली काही दिवसांपासून अनेक पक्षांच्या नेत्यांकडून चर्चेसाठी मला फोन येत होते. म्हणून मी या संदर्भात दिल्लीत आलो. सोनिया गांधी यांनाही एकदा भेटणार आहे.

आमच्या बाजूने २०२४ ची निवडणूक चांगली ठरणार आहे, मात्र त्यांच्या बाजूने ही निवडणूक एकतर्फी असेल असा दावाही त्यांनी यावेळी केला. तिसरी आघाडी नाही, तर मुख्य आघाडी बनणार आहे असे त्यांनी सांगितले आहे. हरयाणातील रॅलीत मी सहभागी होणार आहे. याआधीही मी या रॅलींसाठी गेला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

भाजपच्या काळात एकही नवे काम नाही
यावेळी नितीश कुमार यांनी माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव घेत पुन्हा भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, अटल बिहारी वाजपेयींच्या सहा वर्षात अनेक कामे झाली आणि भाजप सरकारच्या सध्याच्या कार्यकाळात एकही नवीन काम झाले नाही. प्रत्येक गोष्टीला नावे ठेवणे आणि काम न करता प्रचार करणे, काम न करता फक्त प्रसिद्धी करायची, ही काही लोकांची सवय झाली आहे असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या