34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeराष्ट्रीयकारमध्ये एकटे असलात तरीही मास्क बंधनकारक

कारमध्ये एकटे असलात तरीही मास्क बंधनकारक

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कारमधून एकट्याने प्रवास करणा-यांनीही मास्क वापरला पाहिजे, असा निर्वाळा दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच कोरोनाचा प्रसार रोखण्यात मास्क हे सुरक्षा कवचासारखे आहे. त्यामुळे कोट्यवधी लोकांचे जीव वाचले आहेत, असे सुनावत याचिकाकर्त्याला झापले आहे.

दिल्ली सरकारने मास्क वापरणे बंधनकारक केले असून कारमध्येही मास्कविना असल्यास कारवाई केली जात आहे. दिल्ली सरकारच्या मास्क सक्तीच्या निर्णयाला उच्च न्यायालयात एकाने आव्हान दिले होते. याचिकेवर निकाल देताना उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना खडे ोल सुनावले. न्यायमूर्ती प्रतिभा एम. सिंह यांच्या खंठपीठासमोर ही सुनावणी झाली.

जागतिक तज्ज्ञांचाही हाच सल्ला
एक व्यक्ती जरी खासगी वाहनातून प्रवास करत असेल, तरीही त्या व्यक्तीने मास्क वापरणे बंधनकारक असेल, असा स्पष्ट निर्वाळा न्यायालयाने दिला.केवळ सरकारच नव्हे तर वैज्ञानिक, संशोधक, आंतरराष्ट्रीय संस्थंनीही कोरोना संक्रमण रोखण्यासाठी मास्क वापरण्यावर जोर दिला जात आहे, मग तुम्हीच का वेगळे वागता? असेही न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सुनावले.

आणखी ४ आठवडे चिंतेचे; केंद्र सरकारचा गंभीर इशारा

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या